maharashtra day, workers day, shivshahi news,

अक्षय खताळ यांची भाजपच्या ओबीसी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

 "तानाजीराजे यांचे भाजपासाठी मोठं योगदान ; सर्वांच्या शिफारशीने निवड "

BJP, OBC youth president, Akshay khayal, mohol, Solapur, shivshahi news,
जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख अक्षय खताळ यांना निवडीचे पत्र देतांना समवेत माऊली हळणवर , प्रा.सुभाष मस्के आदी 

शिवशाही वृत्तसेवा मोहोळ

दिवंगत जिल्हा परिषद सदस्य तानाजीराजे खताळ यांचे भाजपा वाढविण्यासाठी खूप मोठं योगदान आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना मायेची पाखर देणं ही पक्षाची संस्कृती आहे तालुक्यातील भाजपा च्या सर्वच नेते मंडळींच्या शिफारशी नुसार अक्षय खताळ यांची निवड केली आहे.

- श्रीकांत देशमुख , जिल्हाध्यक्ष भाजपा

 भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी जिल्हा परिषद सदस्य स्व.तानाजीराजे खताळ यांचे चिरंजीव अक्षय खताळ यांची भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

 मागील पंधरा दिवसांपासून अक्षय खताळ नक्की कोणत्या पक्षाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय होऊन वडील तानाजीराजे यांचा वारसा चालविणार या चर्चेला आत्ता पूर्णविराम मिळाला आहे. भाजपा चे आमदार गोपीचंद पडळकर , भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली भाऊ हळणवर व जिल्हा उपाध्यक्ष प्रा.सुभाष मस्के यांच्या माध्यमातून हा निर्णय झाला आहे . यावेळी सांगोला शहराध्यक्ष नवनाथ पवार , ऍड.गणेश ननवरे उपस्थित होते. निवडीनंतर माजी खासदार धनंजय महाडिक , अर्थ बांधकाम सभापती विजयराज डोंगरे , राज्याचे नेते संतोष पाटील , भाजपानेते संजय क्षीरसागर , शंकरराव वाघमारे , तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण , शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर , औदुंबर वाघमोडे , शशिकांत गावडे , पांडुरंग बचुटे आदींनी अभिनंदन केले 

 "ओबीसींसाठी लढेन ; सर्वांचा विश्वास सार्थ ठरवेन "

 आ.गोपीचंद पडळकर व तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या सर्वच नेत्यांनी माझी शिफारस केल्यामुळे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी जी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे जो विश्वास माझ्यावर दाखविला आहे तो निश्चितपणे सार्थ ठरवेन त्याचबरोबर राज्यात ओबीसी आरक्षण बाबत जे चालले आहे तो लढा लढून ओबीसींच्या न्यायिक प्रश्नासाठी प्रसंगी रस्त्यावर सुद्धा उतरणार आहे 

 -अक्षय खताळ , नूतन जिल्हाध्यक्ष 

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !