स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सरकारकडे मागणी
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
गेल्या तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे, त्यामुळे शेती पिकाचे व फळबागांचे नुकसान झाले आहे. कोरोना लॉकडाऊन शेतीमालाचे पडलेले दर यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याचे या अवकाळी पावसाने कंबरडे मोडून टाकले आहे कोरोनाच्या सावटा नंतर आता कुठेतरी शेतातील द्राक्षे डाळिंब केळी टोमॅटो गहू हरभरा भाजीपाला वेलवर्गीय पिके इत्यादी मधून उत्पन्नाची आशा लावून शेतकरी कष्ट करत होता परंतु नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे द्राक्षे डाळिंब हे सेटिंग च्या कळी निघायच्या अवस्थेत असताना झालेल्या अवकाळी पावसामुळे पूर्ण बहर वाया गेला आहे शेतकऱ्याची मोठे आर्थिक नुकसान झाले आहे
त्यामुळे अवकाळी मुळे झालेल्या नुकसानीचे कोणतेही नियम अटी न लावता तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल होणाऱ्या नुकसानीस शासन व आपण जबाबदार असाल याची नोंद घ्यावी. असे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन शिंदे पाटील यांनी प्रांत अधिकारी गजानन गुरव यांना दिले आहे
यावेळीसाहेबराव वागणे,अमर इंगळे, सचिन आटकळे,अशोक पवार, सचिन घोडके,दशरथ जवळेकर, नवनाथ मोहिते,आप्पा चोरमले गणेश कौलगे, अनिल क्षीरसागर,मोनु शिंदे, पांडुरंग माळी,अर्जुन मडके, इत्यादी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा