maharashtra day, workers day, shivshahi news,

छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण पुढच्या पिढीला माहिती असणे काळाची गरज- आ.प्रशांत परिचारक

संघर्ष कसा करावा हे पुढच्या पिढीला समजले पाहिजे - आमदार समाधान आवताडे

Chhatrapati Shivaji Maharaj, fort construction competition, MLA Prashant paricharak, MLA samadhan autade, Maratha mahasangh, Pandharpur, shivshahi news,,

शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर

छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि पृथ्वीराज चव्हाण या तिघांन मुळे आज भारत आपल्याला पाहायला मिळतो आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण पुढच्या पिढीला माहिती असणे आवश्यक आहे. आज किल्ल्याच्या रूपाने आपणास महाराष्ट्राचा इतिहास पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणची किल्ले राजे-रजवाडे हे उध्वस्त झाले. परंतु महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही. येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज व किल्ल्यांची माहिती होण्यासाठी घेण्यात आलेल्या किल्ला स्पर्धेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी कौतुक केले. 

यावेळी बोलताना आ. समाधान आवताडे म्हणाले की सध्याची पिढी असलेल्या लहानापासून तरुणांपर्यंत आपल्या पूर्वजांनी कशा प्रकारे इतिहास घडवला त्याची माहिती असणे ही काळाची गरज आहे तर संघर्ष कसा करावा हे पुढच्या पिढीला समजले पाहिजे असे उद्गार पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी महाराष्ट्र युवा मंच, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या किल्ले स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी काढले. 

यावेळी मायवरांच्या हस्ते किल्ले स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा व अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र कोंढरे साहेब यांच्या संकल्पनेतून आजचा निश्चय पुढचं पाऊल ज्ञानाची आस गुणवत्तेचा विकास व्यावसायिकतेचा ध्यास या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. 

आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, विठ्ठल रुक्मणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड साहेब, लाईफ लाईन हॉस्पिटलचे  डॉ संजय देशमुख, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर, मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात बक्षीस वितरण करण्यात आले. 

दरम्यान विविध मांन्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना या कार्यक्रमाचे कौतुक केले व इथून पुढील काळात असे स्तुत्य उपक्रम राबविण्यात यावेत असे अवाहन केले. सूत्रसंचालन विक्रम बिस्किटे (सर) यांनी केले. यावेळी मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हा सचिव गुरुदास गुटाळ, पंढरपूर तालुकाध्यक्ष संतोष जाधव, शहराध्यक्ष अमोल पवार, शहर उपाध्यक्ष शामराव साळूंखे, शहर संघटक काका यादव, विभागप्रमुख पांडुरंग शिंदे, रिक्षा संघटना अध्यक्ष नागेश गायकवाड, उपाध्यक्ष यशवंत बागल, विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष जीवन गायकवाड, अविनाश मोरे, विनोद लटके, प्रसाद कळसे, शेखर भोसले, भास्कर घायाळ, लक्ष्मण जाधव, दादा यादव, प्रदीप मोरे, विजय मोरे, अक्षय मोरे, मराठा महासंघ चळेचे संग्राम आसबे, मगरवाडीचे सुरज नकाते, महेश उंबरकर, ॲड.सुहास व्होरा, जय महाराष्ट्र युवा मंचचे अध्यक्ष राम साळुंखे, मनीष कुलकर्णी, महेश बोडके, अविनाश गिड्डे, प्रमोद परदेशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मांन्यवर, किल्ला स्पर्धेचे स्पर्धक,पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व मुलीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याचे आयोजन जय महाराष्ट्र युवा मंच,पंढरपूर, अखिल भारतीय मराठा महासंघ पंढरपूर शहर व तालुका यांनी केले होते.

श्री अर्जुनराव चव्हाण मित्र परिवार. सिंहगर्जना ग्रुप, पंढरपूर. यांच्यावतीने आमदार समाधान अवताडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !