तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणा दादा आणि अंजली बाई यांची जोडी प्रचंड गाजली होती त्याचबरोबर कारस्थानी वहिनी साहेबांच्या भूमिकेमुळे या मालिकेतील वहिनी साहेबांची भूमिका करणारी अभिनेत्री धनश्री कडेगावकर घराघरात पोहोचली होती
राणा दादा आणि अंजली बाई यांच्या प्रेमात विघ्न आणून त्यांचा संसार मोडण्यासाठी रोज नवनवी कारस्थाने रचणारी वहिनीसाहेब अर्थात धनश्री कडेगावकर ही अभिनेत्री सध्या तिच्या खऱ्या आयुष्यातील सुखी संसारात रममाण झाली आहे
नुकतेच धनश्री कडेगावकर हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर काही फोटो शेअर केले आहेत धनश्री कडगावकर सध्या तिच्या नवऱ्या बरोबर मुलासोबत गणपतीपुळ्यात सुट्टीचा आनंद घेत आहे
यावेळी समुद्रकिनाऱ्यावर कोकणच्या सौंदर्याचा आस्वाद घेताना नवरा आणि मुलासोबत चे काही फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा