खंडोबाला वांग्याचे भरीत ,बाजरीची भाकरी व कांद्याच्या पातीचा आगळा वेगळा नैवद्य
शेळवे येथील खंडोबाची मूर्ती फोटो क्रेडिट संभाजी वाघुले |
शिवशाही वृत्तसेवा
शेळवे ता.पंढरपुर येथील खंडोबा देवाच्या यात्रेस गुरुवार दि. ९ डिसेबर पासुन सुरवात होणार आहे. शेळवे येथील खंडोबा यात्रा ही चार दिवसाची असते. यात गुरुवार दि. ९ डिसेबर रोजी राञी देव गावात येतो व खंडोबा देवाच्या छबिन्यासह भेटीचा नयनरम्य कार्यक्रम असतो.शुक्रवार दि १० डिसेंबर रोजी मुख्य याञा आहे. यावेळी संपुर्ण गावातुन व परगावाहुन ही खंडोबाचे भक्त वांग्याचे भरीत ,बाजरीची भाकरी व कांद्याच्या पातीचा आगळा वेगळा नैवद्य घेऊन येतात व खंडोबा देवाला दाखवला जातो. याच दिवसी म्हणजे मुख्य याञेदिवसी मंदिरात नयनरम्य गझीढोलाचा पारंपारिक कार्यक्रम साजरा केला जातो हे गछीढोलच या याञेचे आकर्षण असते. गछीढोलाचे पथक अनेक गावावरुन आमंञिक केलेले असतात. या दिवशी भक्तांनी बोललेले नवस फेडण्यासाठी मोठी गर्दी असते. शेळवे खंडोबा याञेसाठी बाहेरगावी स्थाईक झालेले लोक ही आवर्जुन खंडोबाच्या दर्शनाला येतात.शनिवार दि ११ रोजी भल्या पहाटे म्हणजेच दिवस ऊगवतानाच खंडोबा देवाचा लंगर तोडण्याचा कार्यक्रम असतो. हा लंगर देवाचे पुजारी तोडतात.तसेच दिवसभर मनोरंजनाचे कार्यक्रम असतात. रविवार दि १२ रोजी खंडोबा देवाचा छबिना काडुन देव गावात जातो व याञेची सांगता होते. गुरुवार दि २ डिसेबर रोजी खंडोबा देवाचे घटस्थापना झालेली आहे घटस्थापने पासुन दररोज सकाळी व सायंकाळी छबिना काढला जातो. घटस्थापनेपासुन ते मुख्य याञेचा भरीत बाजरीचा नैवद्य दाखवे पर्यत्न शेळवे येथील प्रत्येक घरातील म्हैसीचे दुध विक्री व उसने देणे घेणे बंद असते. या संपुर्ण सात ते आठ दिवसाच्या दुधाचे घटस्थापने पासुन दररोज दुधाचे ताक करुनच गावात सर्वाना व गोरगरिबांना ते ताक वाटप करायचे असते. यालाच खंडोबाचे अणसुट म्हणतात. या सात आठ दिवसात शेळवे गावात चहाला किंवा एखाद्या लहान बाळाला सुद्धा दुध पिण्यास ही मिळत नाही.
याञेसाठी सर्व ग्रामस्थ, शेळवे ग्रामपंचायतीने संपुर्ण गावात स्वच्छता केली आहे व खंडोबा मंदिर व परिसरात शेळवे कृृषि विद्यालयाकडुन रंगरंगोटीचे काम केले आहे.तर विजवितरण कर्मचार्यांनी लाईटीचे सर्व कामे पुर्ण केली आहेत.असे खंडोबा याञा कमेटीने व शेळवे ग्रामपंचायतीने सांगितले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा