पांडुरंग सहकारीच्या चेअरमनपदी आमदार प्रशांत परिचारक बिनविरोध
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
कोणत्याही सहकारी संस्था किंवा साखर कारखाने चालविताना राजकारण करू नये, अशा संस्था सेवाभावी वृत्तीने निस्वार्थी हेतूने चालवाव्यात असे प्रतिपादन आ. श्री प्रशांत परिचारक यांनी केले. ते श्रीपूर येथे श्री पांडुरंग सह साखर कारखाना सभागृहात पुनश्च चेअरमनपदी निवड झाल्यावर बोलत होते. यावेळी कारखान्याच्या व्हाईस चेअरमन पदी श्री कैलास खुळे यांची निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर दिनकर मोरे, नूतन संचालक उमेश परिचारक, माजी व्हाईस चेअरमन वसंत देशमुख, दिलीप घाडगे,दिलीप चव्हाण, लक्ष्मण धनवडे, हरीश गायकवाङ,किसन सरवदे सर,बाळासाहेब यलमार, हणमंत कदम,तानाजी वाघमोडे, सुशीला पाटील, तात्यासाहेब गावडे,दाजी भुसनर, सौ संगीता साळुंखे,भास्कर कसगावडे,कारखान्याचे कार्यकारी अधिकारी यशवंत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना आ. परिचारक म्हणाले, १९९२साली मोठया कठीण परिस्थितीत मोठ्या मालकांनी हा कारखाना चालवायला घेतला.परंतु अनेक अडचणींचा सामना करावा लागला, विरोधकांनी हा साखर कारखाना परिचारक यांना मिळू नये,म्हणून श्री आगाशे यांना जास्त किंमत देतो असे आमिष दाखवून कुरघोड्या करण्याचे प्रयत्न केले. सहकारी संस्था चालविणे सोपे नाही,आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची काय अवस्था झाली आहे, एक जरी कारखाना बंद असेल तर काय परिणाम होतात हे पंढरपूर तालुक्यातील शेतकरी पाहत आहेत. यावेळी श्री विठ्ठल कारखाना उभारणीसाठी कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांचे किती योगदान होते आणि किती कठीण परिस्थितीत भाग भांडवल गोळा केले ,याची माहिती आ. परिचारक यांनी सांगितली. यानंतर चेअरमन ,व्हाईस चेअरमन व सर्व नूतन संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा