जेष्ठसमाजसेवक श्रीरंग ढोक यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
शिवशाही वृत्तसेवा सातारा ( वावरहिरे )
वावरहिरे पाणलिंग मंदिरा चे पुजारी शिवभक्त जेष्ठसमाजसेवक श्रीरंग नाना ढोक यांचे वयाचे 82 व्या वर्षी रहाते घरी सावतानगर येथे अल्पशा आजाराने दि.3 नोव्हेंबर 21 रोजी दु.2.30 वा. दुःखद निधन झाले. त्यांचे मागे पत्नी ,2 मुले ,2 मुली जावई, सुना ,नातवंडे असा परिवार आहे.
1965 ते 1980 च्या कालावधीत त्यांनी अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्था ,मंदिरे यांना नियमित देणगी देत होते तसे इतराना देखील आर्थिक मदत करत होते .तोच वारसा त्यांचे धाकटे चिरंजीव सत्यशोधक रघुनाथ ढोक ,अध्यक्ष फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन हे चालवीत असून त्यांचे संस्थेला थोर समाजसुधारक महात्मा फुले ,ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले,छत्रपती शाहू महाराज ,आणि घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी सावतानागर येथे स्मारकासाठी 27 बाय 30 ची जागा सावतानगर येथे दान केली असून या ठिकाणी सर्व आधुनिक सोयी सुविधा सह बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्र स्थापन करून या ठिकाणी सर्व जाती ,धर्माचे सत्यशोधक विवाह मोफत लावले जात आहेत.तसेच पुणे धायरी येथे देखील सत्यशोधक मोफत विवाह ते लावतात.महापुरुषांचे व वडिलांचे प्रेरणेने महाराष्ट्र व तेलंगाणा राज्यात असे एकूण 28 सत्यशोधक विवाह गेल्या 3 वर्षात लावलेले आहेत.
त्यांचे अत्यंविधी 3 व दशक्रिया विधी दि.4.नोव्हेंबर 21 रोजी सकाळी सत्यशोधक पद्धतीने दहिवडीचे जंगम स्वामी व चिरंजीव सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी पार पडले .त्यांचे जाण्याने सातारा पुणे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा