सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या 7777 साखर पोत्यांचे पूजन संपन्न
शिवशाही वृत्तसेवा भाळवणी
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या चालु गळीत हंगाम 2021-22 मध्ये उत्पादित झालेल्या 7,777 व्या साखर पोत्यांचे पुजन कारखान्याच्या संचालिका श्रीमती मालनबाई काळे व ऊस तोडणी शेतमजुर सौ.सविता गुळवे, राणी सानप, गंगाबाई गुळवे, संगिता सानप, मंदाबाई खाडे या महिला शेतमजुरांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रथम श्रीविठ्ठल व दादांच्या प्रतिमेचे पुजन मा.पाहुण्यांचे शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे चेअरमन कल्याण काळे म्हणाले, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोउणी वाहतुक शेतमजुर व कामगार हे कारखान्याचे महत्वाचे घटक असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खांद्याला खंदा लावुन बांधावर काम करणाऱ्या महिला तसेच आपले घरदार सोडून परभागातुन ऊस तोडणाऱ्या महिला शेतमजुर यांच्या शुभहस्ते पोती पुजन करुन त्यांचाही सन्मान करणे सामाजिक बांधिलकी असल्याचे सांगितले. कारखान्याचे गळीत हंगामास सुरुवात झली असून, गळीतास येणाऱ्या ऊसास पहिला हप्ता 2000/- व एफआरपी प्रमाणे उर्वरीत हप्ता टप्या-टप्याने 300/- देण्यात येणार आहे. मागील 2020-21 मधील एफ.आर.पी.ची संपुर्ण रक्क्म शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. ऊस तोडणी वाहतुकीची मागील कमिशन डिपॉझिटची संपुर्ण रक्क्म अदा करण्यात आली आहे, इंधन दरवाडीचा विचार करुन, प्रचलित ऊस वाहतुक दरामध्ये 13 टक्के दरवाढ करण्यात आली आहे. चालु गळीत हंगामात पंधरवडावाईज ऊस बिले व तोडणी वाहतुकीची बिले अदा करण्यात येणार आहेत. त्यामुळे ऊस वाहतुक ठेकेदारांनी इतर कारखान्याकडे वाहतुक न करता सहकार शिरोमणी कारखान्याकडे शेवटपर्यत ऊस वाहतुक करावी व भागातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत-जास्त ऊस आपल्या कारखान्यास गळीतास देवुन 5.50 लाख मे.टन गळीताचे उद्दिष्ट् साध्य करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी संचालक दिनकर चव्हाण, सुधाकर कवडे, ऊस बागायतदार ऊस तोडणी वाहतुकदार दत्ता नागणे, नारायण शिंदे, महादेव देठे यांनी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपला संपुर्ण ऊस गळीतास देवुन आपल्या कारखान्यास सहकार्य करण्यास सांगुन गळीत हंगामास शुभेच्छा दिल्या. उपस्थितांचे स्वागत कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी केले तर आभार संचालक नागेश फाटे यांनी आभार मानले
यावेळी यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे चेअरमन विष्णु यलमार, श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक समाधान काळे, मिस्टर संचालक महादेव देठे,सहकार शिरोमणी कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजेंद्र शिंदे, माजी व्हा.चेअरमन मारुती भोसले, संचालक सर्व श्री मोहन नागटिळक, गोरख जाधव, बाळासाहेब कौलगे, बिभीषन पवार, भारत कोळेकर, आण्णा शिंदे, राजाराम पाटील, दिनकर कदम, दिनकर चव्हाण, विलास जगदाळे, सुधाकर कवडे, योगेश ताड, युवराज दगडे, इब्राहिम मुजावर, नागेश फाटे, मिस्टर संचालक अरुण बागल, माजी संचालक शिवाजी जाधव, इस्माईल मुलाणी, महादेवभाऊ देठे माजी पंचायत समिती सदस्य सुरशे देठे, कार्यकारी संचालक झुंजार आसबे, अधिकारी कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा