समता भुमी वरील फुले वाडयात घुमला बळी राजाचा जयघोष
शिवशाही वृत्तसेवा पुणे
सत्यशोधक महासभा प्रबोधन सभे तर्फे दरवर्षी प्रमाणे समता भुमी वरील महात्मा फुले वाड्यात विश्व सम्राट बळीराजाची मिरवणूक बलिप्रतिपदादिनी काढण्यात आली यंदाचे 18 वे वर्ष होते. यावेळी प्रथम सामाजिक कार्यकर्ते रोहिदास तोडकर व राजेंद्र शेलार यांचे शुभहस्ते थोरसमाजसुधारक महात्मा फुले व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले तर जेष्ठ समाजसेवक अंकल सोनवणे यांचे शुभहस्ते विश्वसम्राट बळीराजाला पुष्पहार घालण्यात आला. बळीराजाच्या भूमिकेत फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक होते.
यावेळी बळीराजा गौरव महोत्सव समिती मिरवणुकीच्या आयोजिक प्रा.प्रतिमा परदेशी म्हणाल्या की कोव्हिडं च्या काळात मोदी सरकारने शेतकरी विरोधात कायदे करून बळीराजाला अडचणीत आणले आहे.बळीराजाच्या काळात शेतकऱ्या वर संकट आले तर तगाई स्वरूपात मदत करून शेतकऱ्यांना आधार देत होते .दिल्ली मध्ये गेली 9 महिने झाले शेतकरी आंदोलने चालू असून देखील केंद्र सरकार झोपेचे सोंग आणत आहे याचे फळ त्यांना नक्कीच भोगावे लागेल असे देखील परदेशी म्हणाल्या. सत्यशोधक बहुजन पक्षाचे सचिन बगाडे म्हणाले की आज बहुजन समाज जागा होत असल्याने बळीराजाचा खरा इतिहास माहिती करून घेऊ लागला आहे आणि वामन कथा ही भाकडकथा लोकांच्या माती कशी मारली हे सांगितले.
यावेळी बळीराजा वेशभूषेत ढोक म्हणाले की कोणतेच सरकार शेतकरी हिताचे काम करीत नसून कायम अन्याय करीत आला आहे.शेतकरी मालाला योग्य भाव देत नसून अतिरिक्त पावसाने शेतीचे नुकसान झाले तर तातडीने मदत पण करीत नाहीत तसेच ऐनदिवाळीच्या वेळी ग्रामीणभागात मुद्दाम दिवसभरात बरेच वेळा लाईट बंद ठेवत आहेत,खरे तर शेती साठी दिवसा पण लाईट हवी कारण बऱ्याच विधवा महिला शेतीत काम करीत आहेत.
बळीराजाचा जयघोष ईडा पीडा टळू दे बळीराजाच राज्य येऊ दे हा जयघोष व महापुरुषांचे नावांनच्या घोषणानी फुले वाडा परिसर यावेळी घुमघुमला होता.यावेळी मान्यवरांचे कृषिधनाने स्वागत केले तर बळीराजाच्या हस्ते सर्वाना कृषिधन,फळभाज्याचे वाटप करण्यात आले.तर सावित्रीबाई फुले एकपात्री प्रयोग करणाऱ्या वाडिया कॉलेज च्या नुतन प्राचार्या वैशाली रणधीर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी नुकतेच रघुनाथ ढोक यांचे वडील जेष्ठसमाजसेवक श्रीरंग ढोक यांचे निधन झाल्याने सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. शेवटी सत्याचा अखंड महेश बनकर यांचे मागे सर्वांनी म्हंटले तर आभारप्रदर्शन रोहिदास तोडकर यांनी मानले.यावेळी सत्यशोधक चळवळीचे जेष्ठ ,तरुण कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मोलाची मदत प्रतीक परदेशी, वामन वळवी, आकाश ढोक, प्रियंका म्हेत्रे, नाथा परदेशी यांनी केली.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा