शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी पंढरपूर येथे दरवर्षी आळंदी देहू यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून संतांच्या पालख्या येत असतात यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या मध्ये मोठ्या प्रमाणावर वारकरी सहभागी होत असतात आळंदी आणि देहूहून लाखो वारकरी पंढरपूरला पायी चालत येतात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या या लाखो भाविकांची सोय व्हावी तसेच वारी व्यतिरिक्त इतर वेळी सुद्धा पुणे पंढरपूर मार्गावरील वाहतूक जलद गतीने सुरक्षित व्हावी यासाठी पालखी मार्गाचे निर्माण कार्य सुरू होत आहे
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गांचे भूमिपूजन पालखी मार्गाचे भूमिपूजन सोमवारी आठ नोव्हेंबर रोजी पंढरपुरात होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टेली कॉन्फरन्सिंगद्वारे भूमिपूजन पार पडणार असून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पालखी मार्गावरील सर्व भागातील लोकप्रतिनिधी त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार व इतर नेतेमंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत
पंढरपूरच्या रेल्वे मैदानात आयोजित केलेला या भूमिपूजन कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे बारा वाजता पंढरपुरात येणार असून प्रथम ते श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतील त्यानंतर पंतनगर येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते मार्गदर्शन करतील आणि दुपारी दोन वाजता संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहतील या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन पद्धतीने भूमिपूजन करून टेली कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांशी संवाद साधतील
सातशे वर्षांची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाच्या सुविधेसाठी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम पालखी मार्गांचे निर्माण होत असल्याने या भूमिपूजन कार्यक्रमाबाबत वारकरी पंढरपूर परिसरातील नागरिक त्याचबरोबर या मार्गावर येणाऱ्या सर्व भागातील नागरिक यांच्यामध्ये उत्सुकतेचे आणि आनंदाचे वातावरण आहे
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा