आलेगांव बु येथील अपंग दिव्यांग व्यक्तींना ग्रामपंचायतीकडुन 5%निधी व सरकारकडुन महीना पगार
शिवशाही वृत्तसेवा माढा
आलेगांव बु येथील अपंग दिव्यांग व्यक्तींना ग्रामपंचायतीकडुन 5%निधी व सरकारकडुन येनारा महीना पगार मिळवुन देण्यासाठी व गोरगरीबांना त्यांच हक्काच व्यासपीठ मिळवुन देण्यासाठी सेवा त्याग समर्पन संघर्ष या विचाराने समाजातील ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी आलेगाव बु येथील ग्रामस्थांनी प्रहार पक्षांचे जिल्हाध्यक्ष मा.श्री दत्ताभाउ मस्के- पाटील यांच्या हास्ते गावामध्ये प्रहार या शाखेचे उद्घाटन केले. यावेळी जिल्हाउपाध्यक्ष विद्यार्थी संघटना म्हणुन मा.श्री सागर दादा खंकाळ यांची नियुक्ती जिल्हाध्यक्षांच्या हास्ते करण्यात आली. जिल्हाध्यक्षांनी सभेमध्येच थेट लोकरे भाउसाहेबांना फोन करुन अपंगांच्या 5% रक्कमे बद्दल विचारपुस केली व लवकरात लवकर रक्कम चेक स्वरुपात किंवा वस्तु स्वरुपात देण्यास सांगीतले.
यावेळी जिल्हाध्यक्ष- दत्ताभाउ मस्के- पाटील, जिल्हाउपाध्यक्ष- रमेशभाउ पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष-गणेश पवार,माढा तालुका उपाध्यक्ष/रुग्णसेवक- दिपकभाउ लांडगे,प्रहार विद्यार्थी संघटणेचे जिल्हाउपाध्यक्ष-सागरदादा खंकाळ, महीला तालुका अध्यक्षा- कविताताई खंकाळ, कोंढारभाग प्रमुख- जोतीरामभाउ राजगुरु,शाखा अध्यक्ष- सोमनाथ ठावरे,शाखा उपध्यक्ष- रोहण वाघमारे, कार्याध्यक्ष- असिफ शेख, उपकार्याध्यक्ष- आण्णा साखरे, सचिव- मल्हारी जाधव सर्व सदस्य व गावातील ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवली.
त्यावेळी सुत्रसंचालन दिपकभाउ यांनी केले तर आभार प्रदर्शन सागर खंकाळ यांनी केले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा