धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील कुमारी हर्षदा सुनील देसले या कंन्येने बी.एस्.सी कृषी पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला
शिवशाही वृत्तसेवा धुळे
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील कुमारी हर्षदा सुनील देसले या कंन्येने बी.एस्.सी कृषी पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला आहे त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री शरच्चंद्र पवार साहेब व केंद्रीय रस्ते मंत्री मा. श्री नितीनजी गडकरी साहेब तसेच महाराष्ट्राचे कुलपती तथा राज्यपाल महोदय श्री कोश्यारी यांच्या हस्ते महात्मा फुले कृषी विद्यापीठात भव्य सत्कार करण्यात आला. कुमारी हर्षदा देसले या विद्यार्थिनीचे वैशिष्ट्य असे की दरवर्षी तिला प्रथम क्रमांक मिळाल्या बद्दल सुवर्णपदक मिळाले आहे. सलग चार वर्ष सुवर्णपदक मिळवणारी ही एकमेव कन्या आहे तिच्या वडिलांचे सायकल दुकान असून प्रतिकूल परिस्थितीतही हर्षदा ने कधीही उच्चांक सोडला नाही
धूळे जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणार्या किसान कन्ये चे अभिनंदन आज तिच्या शिंदखेडा येथील निवासस्थानी जाऊन स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चे ज्येष्ठ प्रदेश उपाध्यक्ष ,धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी माजी आमदार श्री अनिल अण्णा गोटे साहेब तथा ज्येष्ठ नेते मा. श्री आबासाहेब हिम्मतरावजी पवार तथा धुळे येथील श्रीराम मेडिकल चे मालक व सिंधी समाजाचे नेते श्री विजय भगत तथा श्री बाबू शेठ व हर्षदा चे आई वडील आदी उपस्थित होते
संपूर्ण खान्देश तथा धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कु. हर्षदाचे पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन व भावी वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा असा संदेश एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याचे प्रसिद्धीप्रमुख तथा सोशलमिडिया प्रमुख अविनाश राजाराम लोकरे व धुळे शहर कार्यकारणी पदाधिकारी यांनी दिला आहे
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा