maharashtra day, workers day, shivshahi news,

आजही सत्यशोधक पद्धतीने कार्य करण्याची नितांत गरज आहे - सत्यशोधक रघुनाथ ढोक

 पंढरपूरच्या समता परिषद पदाधिकारी मंडळींनी बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रास दिली आवर्जून भेट

mahaatma fule samata parishad, styashodhak samaj, pandharpur, pune, shivshahi news

शिवशाही वृत्तसेवा पुणे

फुले शाहु आबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रास अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष चंद्रशेखर जाधव, मोहोळ तालुका अध्यक्ष अमोल माळी ,सुहास पिंगळे,शिवाजी भानवसे, सोमनाथ काळे,संतोष माळी आणि दैनिक पंढरी भुषण चे पत्रकार सावता जाधव यांनी दि.16.11.2021 रोजी आवर्जून रात्री 10 वा.भेट दिली. यावेळी सर्व मान्यवरांचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष कर्मवीर, योगाचार्य डॉ.प्रल्हाद वडगांवकर लिखित *महात्मा फुले गीत चरीत्र* प्रकाशक व फुले एज्युकेशन चे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी भेट देऊन यथोचित सन्मान केला.

यावेळी रघुनाथ ढोक यांनी गेली 3 वर्षात 28 सत्यशोधक विवाह , सत्यशोधक गृहप्रवेश ,अनेक प्रथम स्मृतिदिन कार्यक्रम सत्यशोधक पद्धतीने मोफत केल्याचे सांगून आजही विज्ञान युगात अंधश्रद्धा, कर्मकांड चे प्रमाण कमी होताना दिसत नसल्याची खंत व्यक्त केली. पुढे ढोक असेही म्हणाले महात्मा फुले यांनी 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना करून सर्व विधी प्रकार *सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथात* माहिती देऊन कोणताही स्त्री पुरुष कार्य पार पाडू शकतो त्याला भटजींची गरज नाही.त्याकाळात फुले दाम्पत्याने कृतिशील प्रबोधन करूनही आजही बहुजन समाज भीती पोटी अथवा लोक काय म्हणतील म्हणून भटजींच्या हस्ते कार्य करीत आहेत. यामध्ये बहुजन उच्चशिक्षित लोक जास्त आहारी गेल्याने अडचण झाली पण यासर्वाना कोव्हिडं 19 ने चांगलाच धडा दिला आहे तरी देखील आपल्या सारख्या प्रमुख कार्यकर्त्यांनी घरापासून व गावोगावी प्रबोधन करण्याची आजही नितांत गरज असल्याचे देखील म्हंटले.

यावेळी समताचे अध्यक्ष व जेष्ठसमाजसेवक चंद्रशेखर जाधव म्हणाले की पंढरपूर नगरीत ढोक सरांनी पुण्यावरून येऊन अजिंक्य देवमारे व नीता फुले यांचा दि.26 मे 2019 रोजी मोफत पहिला सत्यशोधक विवाह लावून एक दिशा दिली आहे.आणि असे महान कार्य ढोक सर महाराष्ट्र नव्हे तर तेलंगाणा, हरियाणा,राजस्थान, इंदोर मध्ये जाऊन देखील सत्यशोधक कार्य करतात याबद्दल व आमच्या पंढरपूर समता परिषदेच्या वतीने थोरसमाजसुधारक महात्मा फुले यांच्या 125 व्या स्मृतिदिनानिमित्ताने 2015 चा *समता पुरस्कार* दि.3.12.2015 रोजी देऊन गौरव केल्याचा आजही यामुळेच आम्हा कार्यकर्त्यांना सार्थ अभिमान वाटत आहे. 

यावेळी 28 नोव्हेंबर2021 रोजी महात्मा फुले वाडा येथे समतादिनाचा भव्यदिव्य असा प्रबोधनात्मक कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे अन्नपुरवठा नागरी व संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार असल्याने सोलापूर जिल्ह्यातुन अनेक कार्यकर्ते उपस्थितीत रहाण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे समता सैनिक बोलले. यावेळी पत्रकार सावता जाधव यांचा निःस्वार्थीपणे व निर्भिड पत्रकारिता करीत असल्याबद्दल राष्ट्रीय पत्रकारदिनानिमित्त राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सरचिटणीस रघुनाथ ढोक यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी चंद्रशेखर जाधव व सुहास पिंगळे यांचे शुभहस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले तर आशा ढोक यांनी सत्याचा अखंड गायला व शेवटी आभार आकाश ढोक यांनी मानले.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !