जनहित शेतकरी संघटना मुंबईत घालणार सातवे गोडाचे
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एसटी कर्मचारी यांनी गेले पस्तीस दिवस झाले कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा छडा उभा केला आहे. त्यांना न्याय मिळणार मिळणार नाही असे झाल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्यासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज प्रबोधनकार ठाकरे चौक पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. या झोपी गेलेल्या अनिल परबचा जाहीर निषेध म्हणून जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने पंढरपूर येथे कर्मचारी यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून व त्यांच्या सर्व व्यथा जाणून घेऊन नक्कीच यावर आपण सर्वजण मिळून व जनहित शेतकरी संघटना मिळून आपण यावर नक्कीच न्याय मिळवून देऊ असे आश्वासन जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भय्यासाहेब देशमुख यांनी दिले. जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने मुंबई येथे शासनाला सातव्या दिवशीच व परिवहन मंत्र्याला जाग आणण्यासाठी सातव्या दिवशी आम्ही गोडाचे सातवे घालून या परंपरागत विधी करणार आहे असे जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर भय्यासाहेब देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
याप्रसंगी पुढे बोलतांना भैय्यासाहेब देशमुख असे म्हणाले की राज्य शासन रोज एसटी महामंडळाचे दोनशे कोटी रुपयांचे नुकसान होत आहे असे म्हणत आहे मग 200 कोटी प्रमाणे महिन्याचे सहा हजार कोटी रुपये झाले मग यष्टी महामंडळ तुम्ही तोट्या मध्ये आहात आहेत असे वारंवार खोटे बोलत आहात असा आरोप यावेळी त्यांनी केला. शिवशाहीच्या खाजगी एसटीमध्ये व वायफाय मध्ये व अनेक जाहिरातीमध्ये संबंधित मंत्र्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे याची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी प्रभाकर देशमुख यांनी लावून धरलेली आहे. यावेळी उपस्थित जनहित युवक जिल्हा संपर्क प्रमुख नितीन काळे जनहित चे युवक जिल्हा उपाध्यक्ष महेश बिस्किटे जिल्हा संपर्कप्रमुख माऊली भोसले सुरेश नवले महादेव बिले राहुल शिकलकर दिपक साबळे बाबासाहेब देशमुख धनाजी आहेर संघटनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा