ग्रामसभेमध्ये मीनानाथ खताळ यांची बहुमताने निवड
शिवशाही वृत्तसेवा खर्डी
खर्डी तालुका पंढरपूर येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा कोरोना महामारी मुळे दोन वर्ष झालं रखडलेली ग्रामसभा अखेर ग्रामपंचायतीने घेतली. या ग्रामसभेमध्ये गावांमधील प्राथमिक शाळेचे स्थलांतर, स्वस्त धान्य दुकान व्यवस्थापन, वाड्या-वस्त्या वरील रस्त्यांचे मुरमीकरण, संविधान भवन व वाचनालय, जनावरांची शिबिरे, कृषिविषयक विविध योजनांची माहिती, मद्य परवाना अर्ज आले परंतु महिलांची विशेष ग्रामसभा घेऊन निर्णय घेण्याचे ठरले.महावितरण विविध योजना व त्यांच्या अडचणी याविषयी चर्चा होऊन काही ठराव संमत झाले. तसेच शेवटी तंटामुक्ती अध्यक्ष पदाची निवड निवड घेण्यात आली. यावेळी मीनानाथ खताळ यांची बहुमताने निवड करण्यात आली. सरपंच अनुपस्थित असल्याने ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच शरद रोंगे होते. यावेळी
ग्रामसेवक अमर मकर, बी.व्ही कुलकर्णी यांच्यासह युवक, ग्रामस्थ, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीबद्दल युवा नेते प्रणव परिचारक, युटोपियन शुगर चे संस्थापक चेअरमन उमेश परिचारक यांनी नुतन तंटामुक्ती अध्यक्ष मीनानाथ खताळ यांचे अभिनंदन केले.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा