maharashtra day, workers day, shivshahi news,

विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज : श्री. रोहन परिचारक

 कर्मयोगी मध्ये शासनमान्य बी.टेक प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र सुरू

Admission process of engineering, Inauguration of help desk , karmyogi College of Engineering, rohan paricharak, prashant paricharak, shelave, shivshahi news

शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर 

अभियांत्रिकी ची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीभूत पद्धतीने असल्यामुळे विद्यार्थ्यांना काही ठराविक दिलेल्या मुदतीमध्येच प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. या मध्ये विद्यार्थ्यांच्या हातून काही वेळेस चुका होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. कर्मयोगी महाविद्यालयातील सुविधा केंद्रातून मार्गदर्शन घेऊन विद्यार्थ्यानी आपला प्रवेश निश्चित करावा असे प्रतीपादन श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री. रोहन परिचारक यांनी केले. कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालय शेळवे येथे सुरू करण्यात आलेल्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2021 च्या सुविधा केंद्राचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

या बाबत अधिक माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील म्हणाले की राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्षामार्फत बीई/बी टेक साठीची अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जाते. यासाठी कर्मयोगी अभियांत्रिकीला फॅसिलिटेशन सेंटर म्हणून मान्यता ही मिळाली आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी महाविद्यालयामध्ये सॅनिटायझेशन व सोशल डिस्टनसिंग पाळून  प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र चालू करण्यात आले आहे. 

विद्यार्थ्यानी महाविद्यालयातील या सुविधा केंद्रातून मार्गदशन घेऊन अचूकपणे ही प्रक्रिया पूर्ण करावी. सर्वप्रथम प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागते यासाठीची मोफत सोय महाविद्यालयामध्ये केली आहे. महत्वाचे कागदपत्र जमा करणे व ते पडताळणे ही प्रक्रिया ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने करावयाची आहे. प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन व कागदपत्र अपलोड करण्याची प्रक्रिया ही 2 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये पूर्ण करावायची आहे तर जमा केलेले कागदपत्र पडताळनीसाठी 2 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2021 हा कालावधी आहे. तसेच थेट द्वितीय वर्ष  प्रवेशासाठी कागदपत्र अपलोड करण्याची प्रक्रिया ही 2 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर 2021 तर जमा केलेले कागदपत्र पडताळनीसाठी 2 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2021 हा कालावधी असणार आहे. महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या मार्गदर्शन केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, स्कॉलरशिप व इबीसी सवलत यासंबंधीची संपूर्ण मार्गदशन केले जाणार आहे. कोरोंना काळात आर्थिक अडचणीमुळे पालक वर्ग चिंतेत आहे त्यामुळे या सामाजिक जाणीवेतुन कर्मयोगीने श्रध्हेय कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या स्मृतितून विद्यार्थी कल्याण योजना चालू केली आहे. या योजनेतून विद्यार्थ्यांना चार ही वर्षे शैक्षणिक फी मध्ये विशेष सवलत देण्यात येणार आहे. तसेच पांडुरंग सहकारी साखर कारखाना व युटोपीयन साखर कारखान्यांच्या सभासदांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या मुलांना चार ही वर्षे शैक्षणिक फी मध्ये विशेष सवलत देण्यात येणार आहे याचा ही फायदा पालकांनी घ्यावा. 

या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेमद्धे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी म्हणून बाजीराव विहीर ते कर्मयोगी महाविद्यालय अशी कॉलेज बस सेवा ही चालू करण्यात आली आहे. अधिकच्या माहितीसाठी साठी महाविद्यालयाचे प्रवेश प्रक्रिया प्रमुख प्रा. ए ए देशमाने (9552235854) व प्रा. एस जे सावेकर (9860035138) यांच्याशी संपर्क करुन विद्यार्थ्यानी प्रवेश प्रक्रिया अचूक करावी असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी केले. या सुविधा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री. जी. डी. वाळके, उप प्राचार्य प्रा. जे. एल मुडेगावकर तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. 

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !