maharashtra day, workers day, shivshahi news,

जेलमधून बाहेर येताच त्याने केला आणखी एक खून - दक्षिण सोलापूर तालुक्यातील खळबळजनक घटना

मंद्रूप पोलिसांनी फरार आरोपीला २४ तासात केले जेरबंद

solapur murder case, Police arrested the accused, aamsidha pujari, shivshahi news,
आरोपी आमसिध्द पुजारी आणि पोलीस पथक

शिवशाही वृत्तसेवा सोलापूर 

डोक्यात शिरलेलं संशय माणसाकडून कोणतेही काम करून घेतो त्याचेच उदाहरण दक्षिण सोलापूर तालुक्यात घडलेल्या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे बारा वर्षापूर्वी संशयाच्या कारणावरून पत्नीचा खून करणारा आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी पॅरोलवर बाहेर आला आणि पत्नीच्या प्रियकराचा ही त्याने खून केला आहे. 2009 मध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केला होता. या खुनासाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे ही शिक्षा भोगत असताना 12 वर्षांनंतर पॅरोलवर बाहेर आला आणि पत्नीच्या प्रियकराचाही खून केला. ही धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली असून अवघ्या काही तासात कैद्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमसिद्ध पुजारी असं या 64 वर्षीय कैद्याचं नाव आहे. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास मयत ज्ञानदेव नागणसुरे हे आपल्या घराकडे निघाले होते. त्यावेळी रस्त्यात गाठून आरोपी आमसिद्ध पुजारी याने धारदार शास्त्राने वार केले होते. या हल्ल्यात जखमी झालेल्या ज्ञानदेव नागणसुरे यांचा जागीच मृत्यू झाला. या हत्येनंतर आरोपी आमसिद्ध पुजारी हा फरार झाला.

आरोपी आमसिद्ध पुजारी याने 2009 साली चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केली होती. डोक्यात दगड घालून पत्नीची हत्या केल्यानंतर तो स्वतः हुन पोलिसात देखील हजर झाला होता. या प्रकरणात न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पत्नीच्या हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आमसिद्ध काही दिवसांपूर्वी पॅरोलवर बाहेर आला होता.

गावी आल्यापासून आमसिद्ध हा हत्येच्या तयारीत होता. 'मला आणखी दोन खून करायचे आहेत' असं तो नेहमी सांगत होता. यातूनच त्याने ही हत्या केली नागणसुरेची हत्या केल्यानंतर आमसिद्ध पुजारी हा फरार झाला होता.

पोलिसांनी पथक नेमले आणि काही तासांत त्याला जेरबंद केलं. पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून संशयित प्रियकर ज्ञानदेव नागणसुरे याचा खून केला, अशी कबुली पुजारीने दिली.

मंद्रूप पोलिसांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून फरार पुजारीला अटक करण्यात आली.  वडापूर गावच्या हद्दीत कारवाई करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यावर खूनाचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

 

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !