maharashtra day, workers day, shivshahi news,

सरकारची दिवाळी तर पत्रकारांचे दिवाळे - यशवंत पवार

yashvant pawar, patrakar suraksha samiti, solapur, maharshtra

सोलापूर - जवळपास दोन वर्षापासून जीवघेणा कोरोना महामारी ने केवळ राज्यात नव्हे जगात धुमाकूळ घातला असून आपल्या राज्यात कोरोना चे अस्मानी संकट ओढावले केंद्र सरकार अन राज्य सरकार मध्ये समनवय नसल्याने कोरोना चे पडसाद मोठया प्रमाणात उमटले या महामारी ला अटकाव करण्यासाठी संचार बंदी लॉक डाऊन सारख्या प्रभावी अस्त्राचा वापर करण्यात आला सर्व व्यवहार व दळणवळण बंद करण्यात आले याचे गंभीर परिणाम केवळ जनतेवर झाले नसून पत्रकारांना देखील याची झळ पोहोचली असून अनेक वृत्तपत्रे बंद पडल्याने पत्रकारांवर उपासमारी ची वेळ आली अश्या वाईट प्रसंगी वृत्तपत्र च्या मालकांनी पत्रकारांना घरचा रस्ता दाखवला कामावरून कमी करून अश्या वाईट व बिकट परिस्थितीत राज्य सरकार ने पत्रकारांना वाऱ्यावर सोडत कोणतीही मदत केलेली नाही

पत्रकारांचे नोंदणी कधी ?

देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास पंचाहत्तर वर्षे झाली परंतु राज्यात पत्रकारांची नोंदणी नसल्याने राज्यात पत्रकार किती? याची आकडेवारी सरकार कडे नाही शिवाय पत्रकारांची नोंदणी नसल्याने केंद्र सरकार किंवा राज्य सरकार च्या विविध योजनेचा लाभ केवळ नोंदणी नसल्याने पत्रकारांना मिळत नाही ही बाब खूपच गंभीर असून पत्रकारांना त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे

पत्रकारांच्या मृत्यू चं काय ?

कोरोना मुळे राज्यात सुमारे चारशे पत्रकारांचा बळी गेला असून इमानइतबारी करणारी पत्रकारिता अखेर चा घटका मोजत असताना देखील राज्य सरकार केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने अनेक पत्रकारांचा करुण अंत झाला याला जबाबदार कोण?

स्वतः चे कुटुंब बाजूला सारून व आपला जीव धोक्यात घालून राज्य सरकार च्या बातम्या लावणाऱ्या पत्रकारांचा मृत्यू मनाला चटक लावून तर गेलाच त्याच बरोबर राज्य सरकार ची अब्रू देखील वेशीवर टांगून गेला

संघटना मधील भेदभाव पत्रकारांना मारक

राज्यात पत्रकार संघटना उदंड झाल्या असून ज्यांना पत्रकारांचे मूलभूत प्रश्न माहित नाहीत असं लोकं पत्रकार संघटना निर्माण करून पत्रकारांमध्ये भांडणे लावण्याचे काम करत असल्याने नेमकं कोणत्या संघटना मध्ये काम करायचे? असा प्रश्न राज्यातील पत्रकारांना पडला असून पत्रकारांचे नेते म्हूणन मिरवणारे त्यांना पत्रकारांचे प्रश्न दिसत नाहीत केवळ मंत्रालयात बसून संघटना चालवून आपले उखळ पांढरे करून घेण्यात धन्यता मानत असल्याने पत्रकारांचे हाल कुत्रं खाईना अशी वाईट वेळ येऊन ठेपली असताना राज्य सरकार केवळ बोटचेपी धोरण स्वीकारून तमाशा पाहण्याचं काम करत असून राज्यातील अनेक पत्रकारांचे प्रश्न धूळ खात पडले आहेत याला जबाबदार कोण?

एकजुटीला आता पर्याय नाही

जोपर्यंत राज्यातील पत्रकार एकत्र येऊन राज्य सरकार विरोधात लेखणी बंद आंदोलन करत नाहीत किंवा राज्य सरकार च्या बातम्या वर सामुदायिक बहिष्कार टाकत नाहीत तोपर्यंत पत्रकारांचे प्रश्न सूटणार नाहीत हे कायम ध्यानात ठेवा

 

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !