एकरकमी एफ.आर.पी. साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक शरद पवार यांना पत्रं लिहिण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
पंढरपूर - शिवशाही वृत्तसेवा
काल झालेल्या पत्रकार परिषद मध्ये ज्येष्ठ नेते शरद चंद्र पवार साहेब यांनी तीन टप्प्यातल्या एफ.आर.पी. बाबत घेतलेली भूमिका ही शेतकऱ्यांसाठी त्रासदायक आहे व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रेरित करणारे आहे. त्यामुळे पवार साहेबांच्या भूमिकेला विरोध आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफ.आर.पी.मिळाली पाहिजे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून , पवार साहेबांच्या भूमिकेला विरोध दर्शवण्यासाठी शेतकऱ्यांनी पवार साहेबांना लाखों पत्रं लिहून पाठवावी असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या दहा वर्षापासून सातत्याने आंदोलन करून अनेक शेतकऱ्यांच्या पोरांनी गुन्हे दाखल करून घेतले अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी तीन वेळा प्राणांतिक उपोषण केले एवढ्या त्यागातून हा कायदा तयार झालेला आहे आणि हा कायदा मोडण्यासाठी काही कारखानदार व सत्तेतील पुढारी सरकारची दिशाभूल करत आहेत आणि अशा लोकांची बाजू पवार साहेबांनी घेणे म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखेच आहे.
मागिल विधानसभा निवडणुकीत हेच साखर कारखानदार डुबत्या जहाजातून उंदरं पळावी अशी तुम्हाला सोडून पळून गेली होती पण आपण सातारा येथील सभेत पावसात भिजला आणि हाच ऊस उत्पादक शेतकरी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला याच बक्षिस आम्हाला तुम्ही देत आहात का ?
कोरोना महापुर अतिवृष्टी मुळे शेतकरी कोलमडून पडला असताना शेतातील उभ्या असलेल्या उसावर शेतकऱ्यांना कोरोनात दवाखान्यासाठी काढलेल कर्ज, बॅंक सोसायटी पतसंस्थेचे कर्ज, लाईट बिल,मुलांचे शिक्षण,खते बी बियाणे किराणा दुकानदार उधारी,मुलीचे लग्न कार्य इत्यादी
एक रकमी FRP चा कायदा असताना कारखानदार एक वर्ष बील देत नाहीत कायदा मोडीत निघाला तर ऊसाची बिल बुडतील या आधी ही कोट्यवधी ची ऊस बिले बुडली आहेत त्यामुळे कायदा टिकला पाहिजे
"एक रकमी FRP आमच्या हक्काची" या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पवार साहेबांना पुढील आठ दिवसांत एक रकमी FRP आमच्या हक्काची या आशयाची लाखो पत्रे पाठवणार आहे. शेतकर्यांनीसुद्धा याच पद्धतीने पवार साहेबांना पत्रं
मा.श्री.शरदचंद्र पवार साहेब,
मु.पो.गोविंद बाग,बारामती
या पत्त्यावर पाठवावेत. असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यातील व जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे. असे शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा