श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रंगांची आणि सुगंधाची पखरण
विजया दशमी (दसरा ) निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट |
पंढरपूर - शिवशाही वृत्तसेवा
भारतीय संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्ताला विशेष महत्व आहे त्यापैकीच एक विजया दशमी अर्थात दसरा हा एक मुहूर्त आहे. मोठ्या सणांतला हा सण सर्व भारतीय उत्साहाने साजरा करतात. घरोघरी दसरा साजरा केला जातोच, त्याचबरोबर या सणांचे धार्मिक महत्व असल्याने सर्व मंदिरे आणि धार्मिक स्थळे येथेही हा सण विविध पद्धतीने साजरा केला जातो.
महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दसरा पारंपरिक पद्धतीने साजरा केला गेला. गेल्या काही दिवसांपासून मंदिर समितीने सण-उत्सवानिमित्त मंदिराला फळ फुलांची सजावट करण्याची परंपरा सुरु केली आहे. विजया दशमीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर झेंडूच्या फुलांनी सजवले आहे. दसऱ्याला झेंडूच्या फुलांचे विशेष महत्व असते, त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे गर्भगृह ( गाभारा ) सभामंडप, गरुडखांब, या सर्व मंदिराचा भागात फुलांची आकर्षक सजावट केली आहे. पुणे येथील विठ्ठलभक्त राम जांभुळकर यांनी ही पुष्पसजावट विठ्ठलरुक्मिणी चरणी अर्पण केली असून , झेंडू बरोबरच गुलाब, कार्नेशन , जरबेरा, ग्लोडीओ, कामिनी, अशा विविध प्रकारच्या ५०० किलो फुलांचा वापर करून , पंढरपूरच्या, शिंदे बंधूंच्या, साई डेकोरेटर्स, यांनी हि सुंदर पुष्परचना केली आहे.
या आकर्षक पुष्परचनेमुळे मंदिर व गाभाऱ्यात रंगांची आणि सुगंधाची उधळण झाली असून विजया दशमी अर्थात दसऱ्याचा आनंद द्विगुणित झाला आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा