बार्शी पोलिसांची कामगिरी, खुनातील फरार आरोपीस एका दिवसातच शोधून अटक केली.
बार्शी - प्रतिनिधी
बार्शी येथील आईच्या खून प्रकरणातील संशयित आरोपीस बारशी शहर पोलीस पथकाकडून नराधम मुलास रत्नागिरी येथून अटक करण्यात आली. श्रीराम नागनाथ फावडे ( वय २१ ) असे आईचा निर्घृण खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. रुक्मिणी नागनाथ फावडे ( वय ४५ , रा. वाणी प्लॉट ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. जन्मदात्या आईचा मुलानेच झोपलेल्या ठिकाणीच आईच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करून, मृतदेह गाडीसह ओढत घराबाहेर आणून झुडपात टाकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. व संशयित आरोपी मुलगा फरार झाला होता. याप्रकरणी श्रीराम याच्यावर बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. माणुसकीला काळिमा फासणारा हा खुनाचा प्रकार दिनांक १२ मंगळवारी सकाळी बार्शीत उघडकीस आला होता. पोलीस हवालदार अरुण माली यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर स.पो.नि. ज्ञानेश्वर उदार ,अजित वर्पे, लक्ष्मण भांगे, यांच्या पथकाने संशयितास रत्नागिरी येथून ताब्यात घेऊन चौकशी करून, अटक केली. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक रामदास शेळके करत आहेत.
#rukmini_favade #barshi_murder_case #police_solapur #shriram_fawade #shivshahi_news
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा