अधिकाऱ्यांना निवेदन देताना आ. प्रशांत परिचारक, आ. समाधान आवताडे व इतर |
पंढरपूर - शिवशाही वृत्तसेवा
पंढरपूर सांगोला रस्ता कासेगाव हद्दीत वनविभागातून जातो हा संपूर्ण रस्त्याचे काम चालू असताना वनविभागाने आडमुठेपण करत रस्त्याच्या कामासाठी परवानगी दिली नाही त्यामुळे पंढरपूर सांगोला रस्त्याचा कासेगाव जवळचा काही भाग अपूर्ण राहिला आहे या परिसरात रस्ता अपूर्ण राहिल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे हा जास्त रहदारीचा रस्ता असल्याने येथून ये-जा करणाऱ्या वाहनांना आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर वाहने जात असताना धुळीचासुद्धा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. वेगाने जाणारी वाहने खराब रस्त्याजवळ अचानक ब्रेक लावत असल्याने अपघाताचीसुद्धा शक्यता निर्माण झाली आहे. वास्तविक हा रस्ता तयार करत असताना राज्य सरकारच्या अख्यारीत असलेल्या वन विभागाने तातडीने परवानगी देणे अपेक्षित असताना, परवानगी दिली गेली नाही. वनविभागाच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे रस्त्याचे काम अर्धवट राहिले आहे याबाबत नागरिकांनी अनेकदा निवेदने देऊन पाठपुरावा केला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांकडेच वनखाते आहे. तरीही या रस्त्याला परवानगी मिळाली नसल्याने भाजपच्या वतीने अखेर रास्तारोको आंदोलन करण्यात आले . आमदार समाधान आवताडे आणि आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वात आज कासेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर वनविभाचे अधिकारी आंदोलनस्थळी आले आणि या रस्त्याचे काम उद्याच चालू करू, तसेच डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण करण्याचा प्रस्ताव वरच्या कार्यालयाला तातडीने पाठवून कामाला परवानगी मिळवू असे आश्वासन दिल्याने हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले
वनविभागाच्या आडमुठ्या धोरणांमुळे आंदोलन करण्याची वेळ - आ. प्रशांत परिचारक
यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणारे आमदार पारशांत परिचारक म्हणाले कि " गेल्या अनेक दिवसांपासून वनविभागाच्या आडमुठ्या धोरणांमुळे रस्त्याचे काम रखडले असून मी व आमदार समाधान आवताडे यांनी वनमंत्र्यांना भेटून निवेदन दिले आहे तरीही याबाबत काहीच कार्यवाही झाली नाही. आपले पालकमंत्र्यांकडेच वनखाते असूनही या रस्त्याच्या कामाला परवानगी मिळाली नाहीच हे दुर्दैव आहे. अशा छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी आंदोलन करायची वेळच यायला नाही पाहिजे पण आज आंदोलन केल्यावर वनविभागाला जग आली हे हि कमी नाही देर आये दुरुस्त आये "
अन्यथा यापेक्षा मोठे आंदोलन छेडण्यात येईल - आ. समाधान आवताडे
"आज पंढरपूर सांगोला रस्त्याच्या कामासाठी भारतीय जनता पार्टी आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले असता संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे आणि लवकरच हे काम सुरु होणार आहे . परंतु भविष्यात या कामाला जर उशीर झाला तर यापेक्षाही मोठे आंदोलन छेडण्यात येईल " असे विधान आंदोलनाचे नेतृत्व करणारे आमदार समाधान आवताडे यांनी केले .
या आंदोलनावेळी भाजपा कार्यकर्ते , परिसरातील शेतकरी उपस्थित होते. रास्ता रोको केल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती आणि आंदोलन स्थळाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रंग लागल्या होत्या.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा