maharashtra day, workers day, shivshahi news,

अभिजीत पाटलांनी केवळ एक महिन्यात बंद अवस्थेत असलेला कारखाना सुरू केला - सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

धाराशिव साखर कारखाना युनिट4 सांगोला साखर कारखान्याचा  गळीत हंगामाचा शुभारंभ

sangola sugar factory , abhijit patil, Co-operation Minister Balasaheb Patil, MNS leader dilip dhotre, MLA shahaji patil dipak salunkhe, kailas patil, mp omraje nimbalkar, sahivshahi news,
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे स्वागत करताना अभिजित पाटील व मान्यवर

सांगोला - शिवशाही वृत्तसेवा

धाराशिव साखर कारखाना युनिट क्र.४(सांगोला सह.साखर कारखाना) चा गळीत हंगामाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,उस्मानाबादचे आमदार कैलासदादा पाटील,सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील,सांगोल्याचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील,शेकाप नेते चंद्रकांत देशमुख, मनसे नेते दिलीप धोत्रे, अविनाश महागावकर आदी उपस्थित होते. 

sangola sugar factory , abhijit patil, Co-operation Minister Balasaheb Patil, MNS leader dilip dhotre, MLA shahaji patil dipak salunkhe, kailas patil, mp omraje nimbalkar, sahivshahi news,
मोळी टाकून कारखाना सुरु करताना मान्यवर

हा कारखाना कुणीही चालवायला घेत नव्हते परंतु अभिजित पाटील यांनी तीन कारखाने यशस्वीपणे चालवल्याचा अनूभव सोबत घेऊन सांगोला कारखाना चालविण्यासाठी घेण्याचे धाडस दाखवले आहे. त्याची धडाडी आणि सहकार क्षेत्रातील असलेला दांडगा अनुभव असल्याने यशस्वी चालू केला. अभिजित पाटलांच्या ताब्यात कारखाना आल्यानंतर केवळ पंधरा ते वीस दिवसांत आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर सुरू केला. सांगोला माळशिरस पंढरपूर मंगळवेढा भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले. त्यांनी त्यांचे इतर तीन कारखाने ज्या चांगल्या पद्धतीने चालवले तसेच हा कारखाना चालवतील व शेतकऱ्यांना योग्य मोबदला देतील अशी अपेक्षा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी

व्यक्त केली.गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनाला सहकार्य करणे गरजेचे आहे, कारखान्याकडे नोंदलेल्या संपूर्ण उसाचे गाळप झाले पाहिजे त्या दृष्टीने कारखान्याने नियोजन करावे.यंदा पाऊसकाळ चांगला झाला असून, शेतीला पाणी कमी पडणार नाही, तरीही शेतकऱ्यांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, ठिबकद्वारे शेतीला पाणी द्यावे, त्यामुळे उत्पन्नात वाढ होण्यास निश्चित मदत होईल. हा कारखाना चालू करण्यासाठी दिपक आबा साळुंखे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व अजित पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगितले.तर आ. शहाजीबापू पाटील यांनी हा कारखाना चालू करण्यासाठी शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. 

यावेळी चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले की या कारखान्यासाठी ऊस देणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना FRP प्रमाणे दर दिला जाईल. तसेच सभासदांच्या व कामगारांच्या हितासाठी भविष्यात को-जन डिसलेरी भविष्यात उभारली जाईल असे सांगितले.तसेच कारखान्याचे यंदाच्या वर्षी ५ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट असून उत्पादीत होणारी साखर परदेशात पाठवली जाईल असेही त्यांनी सांगितले.गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या सांगोला सहकारी कारखान्याचे धुराडे काल अखेर पेटले आहे. पंढरपूरच्या अभिजीत पाटलांनी बंद अवस्थेत असलेला सांगोला कारखाना सुरु करुन पंढरपूर व सांगोला तालुक्यातील अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संजीवनी दिली आहे असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. तर शेतकऱ्यांनी कारखाना एक महिन्याच्या आत चालू केल्याने अभिजित पाटील यांचे आभार मानले.यावेळी सांगोला व पंढरपूर तालुक्यातील व पंचक्रोशीतील अनेक शेतकरी व मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !