टी-20 विश्व चषकाचा यावर्षी भारत प्रबळ दावेदार
भारत (india) आणि पाकिस्तानचा(pakistan) संघ 24 ऑक्टोबरला T20 विश्वचषक 2021(T20 World Cup 2021) मध्ये आपापल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारत (india) आणि पाकिस्तान(pakistan) यांच्यातील सामना रविवारी दुबईत संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. विराट कोहलीच्या (virat kohali) टीम इंडियाचे(team India) भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर वर्चस्व आहे. भारताने T20 (T20 World Cup 2021)विश्व चषक मालिकेत पाकिस्तानबरोबर ५ सामने खेळले असून सर्व ५ सामने भारतानेच जिंकले आहेत. सर्व टी -20 सामन्यांचा विचार करता त्यातही भारताचाच वरचष्मा आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध 8 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यापैकी सहा जिंकले आहेत. तर एक सामना बरोबरीत झाला होता. पाकिस्तानसोबत खेळलेल्या एकूण टी-20 सामन्यांपैकी फक्त एक सामना भारताने गमावला. भारताने पाकिस्तानविरुद्धचे शेवटचे चार टी -20 सामने जिंकले आहेत. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ T20 विश्वचषक 2021(T20 World Cup 2021) च्या गट 2 मध्ये आहेत. या दोघांव्यतिरिक्त या गटात अफगाणिस्तान, न्यूझीलंड, स्कॉटलंड आणि नामिबियाचे संघ देखील आहेत. टी-20 विश्व चषकाचा यावर्षी भारत प्रबळ दावेदार मानला जात आहे
भारत एकूण 5 सामने खेळणार
टी 20 विश्वचषक 2021 मध्ये भारताच्या वेळापत्रकानुसार, 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध मोहिम सुरू केल्यानंतर टीम इंडिया 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी सामना करेल. दुबईमध्ये रविवारी संध्याकाळी 7.30 वाजता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना खेळला जाईल. गट 2 मध्ये भारत एकूण 5 सामने खेळणार आहे, एक सामना वगळता बाकीचे सर्व सामने दुबईत खेळवले जातील. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना अबुधाबी येथे होणार आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा