देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा पुरस्कार 16 नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणार पुरस्कार वितरण
श्री पांडुरंग कारखान्याला सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार |
शिवशाही वृत्तसेवा श्रीपुर
नवी दिल्ली येथील नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि. यांच्या मार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली असून देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यासाठी दिला जाणारा पुरस्कार श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे 2020-21 च्या गाळप हंगामात श्री पांडुरंग कारखान्याने साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे हा पुरस्कार श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याला मिळाला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांत परिचारक यांनी पत्रकारांना दिली आहे
पांडुरंग सहकारी साखर कारखाना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, करमाळा, माढा, या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वरदान ठरला आहे नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह सुगर फॅक्टरीज नवी दिल्ली यांच्या वतीने दरवर्षी 'वसंतदादा पाटील' सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना हा पुरस्कार देण्यात येतो 2020-21 साठी हा पुरस्कार श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाल्याने हा पुरस्कार मिळवणारा श्री पांडुरंग सहकारी जिल्ह्यातील पहिला साखर कारखाना ठरला आहे पूर्णक्षमतेने ऊस गाळप, साखर उतारा, वेळेत दिलेले ऊस बिल, आर्थिक व्यवस्थापन, कर्जाची परतफेड, ऊस वाढीच्या योजना, खर्चात केलेली बचत, गुंतवणूक, कमी उत्पादन खर्च, संचीत नफा, नक्त मूल्य, कर्ज उभारणी मर्यादा, व उपलब्ध निधीचा विनियोग करण्यासाठी कारखान्याने केलेले नियोजन, अशा अनेक निकषांचा विचार करून नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज नवी दिल्ली यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने कार्यक्षमतेचा पूर्ण वापर करून हा पुरस्कार मिळवला आहे कारखान्याने आजवर देश व राज्य पातळीवरील एकूण 36 पुरस्कार प्राप्त केले असून या पुरस्काराचे वितरण 16 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांनी दिली आहे
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा