शेतकर्यांना कारखानदारांकडून फक्त आश्वासन मिळत आहे, एफ आर पी नाही
साखर कारखान्याचे संग्रहित छायाचित्र |
शिवशाही - विशेष
सध्या जिल्ह्यातील जवळपास सर्वच कारखान्यांनी बॉयलर प्रदीपन कार्यक्रम केले आहेत . समाजातील विविध मान्यवरांच्या हस्ते काही कारखान्यांनी बॉयलर प्रदीपन करून 2021 22 चा गळीत हंगाम सुरू करण्याची जोरदार तयारी केली आहे कारखान्याचे चेअरमन चेअरमन एमडी संचालक हे आपला कारखाना सुरू होणार असून लवकरच गाळप सुरू होणार असल्याचे बोलत आहे तसेच प्रत्येक कारखाना आपल्याकडे किती उसाची नोंद झाली आहे याची ही आकडेवारी जाहीर करत आहेत गतवर्षी आणि यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने उसाची मुबलक लागवड झाली आहे त्यामुळे कारखानदारांना उसाची चिंता नसली तरी गतवर्षीची एफ आर पी ज्या कारखान्यांनी दिली नाही त्यांना चालू हंगामात गाळप परवाना मिळण्याची शक्यता धूसर आहे
सन 2021 22 या वर्षांमध्ये होणाऱ्या गाळप हंगामासाठी जिल्ह्यातील ते30 साखर कारखान्यांनी साखर आयुक्तांकडे गाळपाचा परवाना मिळावा यासाठी प्रस्ताव सादर केले होते परंतु त्यामधील बऱ्याच कारखान्यांनी एफ आर पी प्रमाणे शेतकऱ्यांना ऊस बिले आता केली नसल्याने साखर आयुक्तांनी जिल्ह्यातील केवळ सात कारखान्यांना सध्या गाळप परवाना दिला आहे
सोलापूर जिल्ह्यातील भैरवनाथ शुगर लवंगी, भैरवनाथ शुगर विहाळ, युरोपियन शुगर, सासवड माळी शुगर, गोकुळ माऊली, कूर्मदास, जकराया शुगर, या सात कारखान्या नाच सध्यातरी परवाना मिळाला आहे जिल्ह्यातील इतर 26 कारखाने अजून गाळप परवान्याच्या प्रतीक्षेत आहेत
सन 2021 22 गळीत हंगाम ऑक्टोबरपासून सुरू होत असून जिल्ह्यातील तेहतीस कारखान्यांनी गाळप परवानगीसाठी प्रस्ताव सादर केले होते मात्र अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊस बिले एफआरपी अदा केली नसल्याने साखर आयुक्तांकडून गाळप परवानगी देण्यात आली नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये एकेकाळी ज्या कारखान्यांनी ऊस बिलाची उच्चांकी दर दिले होते त्या कारखान्यांची सुद्धा नावे गाळप परवाना मिळालेल्या कारखान्यांच्या यादीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे मात्र एफ आर पीची रक्कम दिल्याशिवाय साखर कारखानदारांना गाळप परवाना देणार नाही त्याबरोबरच मुख्यमंत्री सहायता निधी साठी निधी देणे कारखान्यांना बंधनकारक केले आहे या प्रमुख अटींची पूर्तता करणाऱ्या कारखानदारांनाच गाळप परवाना देण्यात येणार आहे
जिल्ह्यातील काही साखर कारखानदार एफआरपी देण्याचे आश्वासन देत आहेत परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना एफ आर पी ची रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहेत त्यामुळे साखर आयुक्तांनी अशा कारखानदारांना पाठीशी घालू नये आणि त्यांच्या आश्वासनांना भुलून गाळप परवाना देऊ नये अशी मागणी विविध शेतकरी संघटनांकडून केली जात आहे
कारखाने देत आहेत एफ आर पी ची खोटी माहिती
जिल्ह्यातील अनेक साखर कारखानदार आणि लेखापरीक्षण अधिकाऱ्यांना हाताशी धरून व्यापार पी दिली असल्याची खोटी माहिती दिली आहे प्रत्यक्षात मात्र अनेक साखर कारखानदारांनी अद्याप शेतकऱ्यांना या पार्टीचे रक्कम दिलेलेच नाही त्यामुळे अशा साखर कारखानदारांची चौकशी साखर आयुक्तांकडून केली जावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे
विविध शेतकरी संघटना आक्रमक
जिल्ह्यातील कारखानदारांनी शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी टाळाटाळ केली आहे शेतकऱ्यांची एफआरपी जोपर्यंत कारखानदार देणार नाहीत तोपर्यंत कारखानदारांना गाळप परवानगी देऊ नये आणि यावर्षी किती देणार हेदेखील कारखानदारांनी जाहीर करावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी केली आहे
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा