सांगोला विद्यामंदिर,लायन्स क्लब, म.सा.प ,नगर वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
शिवशाही वृत्तसेवा सांगोला
सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला, लायन्स क्लब ऑफ सांगोला,महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सांगोला व नगर वाचन मंदिर सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे काव्य कोजागिरी या कार्यक्रमांमध्ये कवी सुनील जवंजाळ, कवी सूर्याजी भोसले ,कवी प्रेमकुमार वाघमारे यांनी आपल्या काव्य सादरीकरणातून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी व्यासपीठावर सां.ता.शि. प्र.मंडळ सांगोला, म.सा.प.,नगर वाचन मंदिर अध्यक्ष ला.प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य ला.भीमाशंकर पैलवान, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा ,सांगोला उपाध्यक्ष डॉ. प्रभाकर माळी,लायन्स क्लब ऑफ सांगोला अध्यक्ष ला.प्रा. धनाजी चव्हाण ,कवी सुनील जवंजाळ, कवी सूर्याजी भोसले, कवी प्रेमकुमार वाघमारे उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न,मुलीचे वेगळेपण,शिक्षण ,पुस्तकांचे महत्व,बापाचे छत्र अशा आशयप्रधान, प्रेम , निसर्ग,फटका,लावणी याप्रकारच्या मनोरंजन व प्रबोधनवादी तसेच मौलीक विचार देणाऱ्या कवितांचे बहारदार सादरीकरण झाले. कार्यक्रमाची सांगता दुग्धपान व अल्पोपहाराने झाली. या कार्यक्रमाला सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे ,पर्यवेक्षक पोपट केदार, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, नगर वाचन मंदिर सांगोला सचिव मिलिंद फाळके ,व सदस्य , लायन्स क्लब ऑफ सांगोला सचिव उन्मेष आटपाडीकर, खजिनदार काकासो नरुटे व सदस्य ,म.सा.प सांगोला सहकार्यवाह प्रा.शिवशंकर तटाळे व सदस्य, मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य भीमाशंकर पैलवान यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार लायन्स क्लब सांगोला सचिव उन्मेष आटपाडीकर यांनी केले..
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा