पीपल्स डेव्हलपमेंट फाउंडेशन ( महाराष्ट्र राज्य) या संघटनेचा सामाजिक उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा
शेळवे (संभाजी वाघुले)
पीपल्स डेव्हलपमेंट फाउंडेशन ( महाराष्ट्र राज्य ) ने मौजे- खेडभाळवणी, तालुका- पंढरपुर याठिकाणी बुधराणी हॉस्पिटल ,कोरेगाव पार्क, पुणे यांच्या सहकार्याने दिनांक 18/ 10/ 2021 रोजी आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू, काचबिंदू शिबिरात 70 लोकांनी लाभ घेतला.
या शिबिराचे उदघाटन खेडभाळवणी गावचे प्रथम नागरिक सरपंच- या कार्यक्रमाचे स्वागत अनिल महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले या वेळी सरपंच संतोष साळुंखे, उपसरपंच अविनाश पाटील शहाजी पाटील ,अण्णा पवार, अरविंद चव्हाण, अशोक साळुंखे, सुभाष साळुंखे, राहूल साळुंखे उपस्थित होते. या शिबिरात गावातील ७० लोकांनी मोफत नेत्रतपासणी चा लाभ घेतला, त्यामध्ये 22 लोकांना अल्पदरात चष्मे वाटप होणार असून 16 लोकांना डोळ्याच्या ऑपरेशन साठी बुधराणी हॉस्पिटल कोरेगाव पार्क, पुणे या ठिकाणी पाठविण्यात येणार आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले ,शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या कार्यकर्त्यांचे पीपल्स डेव्हलपमेंट फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य) चे संस्थापक/ अध्यक्ष श्री. ज्ञानदेव उर्फ दिपक काकडे ,संभाजी वाघुले ,शैलेंद्र मस्के,सुशांत गाजरे व बुधराणी हॉस्पिटल च्या डॉ. माया हजारे यांनी आभार मानले तर खेडभाळवणी गावामध्ये शिबिराचे आयोजन करून गावातील लोकांना जी सेवा दिली त्याबद्दल शिबिराचे आयोजक पीपल्स डेव्हलपमेंट फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य) चे संस्थापक/ अध्यक्ष श्री. ज्ञानदेव उर्फ दिपक काकडे यांचे गावचे सरपंच संतोष साळूंखे व शहाजी पाटील यांनी आभार मानले
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा