प्रशालेच्या ८वी ते १०वी च्या ६५ विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग
६५ विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग |
पंढरपूर - शिवशाही वृत्तसेवा
पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून दिनांक 16/10/21 या दिवशी साजरा करण्यात आला.
पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा |
प्रथम प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ सुनिता मोहोळकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व मुख्याध्यापिका मोहोळकर यांनी वाचनाचे महत्त्व कलामांचे विचार व बोधपर वाक्य मुलांना सांगितली व शंभर मित्रां इतकी माहिती एका पुस्तकातून मिळू शकते ,तेव्हा पुस्तक हेच खरे मित्र ही गोष्ट त्यांनी मुलांना पटवून दिली. यानंतर प्रशालेच्या शिक्षिका सौ सूर्यकांन, तसेच सौ धांडोरे या या शिक्षकांनीही वाचनाचे महत्त्व सांगितले.
यानंतर मुलांना विविध साहित्यांची पुस्तके देऊन एक तास वाचन करून घेण्यात आले यामध्ये प्रशालेत रोज येणाऱ्या आठवी ते दहावी या वर्गांच्या एकूण 65 विद्यार्थ्यांचा सहभाग होता मुलांनी अगदी रंगून जाऊन पुस्तके वाचली व दहावीतील विद्यार्थिनी कुमारी सोनाली सिंग हिने अंधका या वाचलेल्या शिवपुत्रा वर आधारित कथेची माहिती मुलांना सांगितली त्यानंतर मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी रोज एक तास अवांतर वाचण्याचा संकल्प केला गेला. तसेच विद्यार्थ्यांबरोबर सर्व शिक्षक स्टाफ नेही अवांतर वाचनाचा संकल्प केला. अशाप्रकारे अत्यंत उत्साहाने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील शिक्षिका सौ माने, सौ मेड ,सौ व्यवहारे, सौ किरपेकर, सौ जाधव, सौ लांबोरे कुमारी बोरखडे व श्री तेंडूलकर व श्री उत्पाद सरांनी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा