नॉनक्रिमिलियरची मर्यादा 20 लाख करावी आणि ज्या त्या वर्षी शिष्यवृत्ती वाटप करावी -रघुनाथ ढोक
पुणे प्रतिनिधी -
राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेशचे पुणे शहर व जिल्हातील नवनिर्वाचित पदाधिकारी यांची पहिली सभा रविवार दि. २६ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ४.०० वा. उद्यान प्रसाद मंगल कार्यालय, खजिना विहीरीजवळ, सदाशिव पेठ, पुणे आयोजित केली होती.
यावेळी डॉ.वडगांवकर,डॉ.ऍड. कुंभार आणि रघुनाथ ढोक यांनी आपल्या भाषणात ओबीसींची राष्ट्रिय जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे व ओबीसी विद्यार्थ्यांची शिक्षवृत्ती दरवर्षी त्याच वर्षात मिळालीच पाहिजे, व तातडीने नाॅन क्रीलीमिअरची मर्यादा २० लाख करावी असे म्हंटले. अन्यथा यासंदर्भात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करू असे देखील म्हंटले. तसेच याबाबत मीटिंग मध्ये राज्य व केंद्र सरकारला संपूर्ण महाराष्ट्रातून पोस्ट कार्ड द्वारे निवेदन देण्याचा एकमताने निर्णय झाला. या प्रमुख मागणीसह सर्व जातीना प्रतिनिधित्व व संघटना बांधणीबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, डाॅ. प्रल्हाद वडगांवकर, सरचिटणीस श्री. रघुनाथ ढोक यांचेसह महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष, अॅड. डाॅ. पी. बी. कुंभार, जनरल सेक्रेटरी, श्री. सुभाष मुळे उपस्थित होते. याप्रसंगी सर्व नुतन पदाधिकारी यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व ओबीसी चे जेष्ठ समाजसेवक मा.शरद ताजणे यांनी संघटना वाढीसाठी मौलिक मार्गदर्शन करीत समाजाचे काहीतरी देणे आहे असे समजून प्रत्येकानी शेवटच्या घटकाला न्याय मिळेल यासाठी कार्य करावे असे आव्हान केले.
यावेळी पुणे शहर अध्यक्ष, प्रा. उमेश गवळी सर, महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य कार्याध्यक्ष श्री. संदीप लचके, वरीष्ठ उपाध्यक्ष श्री. भगवान शिंदे, उपाध्यक्ष श्री. कैलास नेवासकर, सचिव श्री. सुधाकर कुंभार, सहसचिव श्री. रणजीत माळवदे, संपर्क प्रमुख विजय कुंभार, समन्वयक श्री. दीपक महामुनी, जेष्ठ ओबीसीचे नेते श्री शरद ताजणे यांचेसह विभागीय पदाधिकारी श्री. दिगंबर क्षीरसागर, श्री. बाबुराव लष्करे, श्री. सिद्धेश्वर हिरवे, श्री. सुभाष पांढरकामे, श्री. ज्ञानेश्वर पाटेकर, ज्योतीराम कुभार, श्री. राकेश खडके, राहुल सुपेकर, श्री. रजनीकांत निखळ, मदन लंगडे, सौ.वडगांवकर व इतर पदाधिकारी व बहुसंख्य मान्यवर हजर होते .
कार्यक्रमाचे शेवटी चिटणीस सुभाष मुळे यांनी आभार मानले .
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा