विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या प्रशिक्षणाची संधी : श्री. रोहन परिचारक, कर्मयोगी व झेंसार प्रा.ली. मध्ये सामंजस्य करार

कर्मयोगी व झेंसार प्रा.ली. मध्ये सामंजस्य करार 

विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या प्रशिक्षणाची संधी : श्री. रोहन परिचारक

karmyogi engineering college, rohan prashant parichar, zensaar , shivshahi news

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालय शेळवे, पंढरपूर व मुंबई येथील आर.पी.जी.एफ. चॅरीटेबल ट्रस्ट (झेंसार सी.एस.आर. उपक्रम अंतर्गत) नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना या झेंसार कंपनीकडून नोकरी साठी आवश्यक असणारे उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये खूप मोठा फायदा होणार असल्याची माहिती, संस्थेचे विश्वस्त श्री रोहन परिचारक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली.

      यासंदर्भात माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील म्हणाले की, अभियांत्रिकी  विद्यार्थ्यांचे बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड होण्याचे एक स्वप्न असते, परंतु त्यासाठी शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच इतर ही कौशल्ये विद्यार्थ्यांच्या अंगीभूत असणे ही आता काळाची गरज बनली आहे आणि यासाठीच कर्मयोगी महाविद्यालयाने हा सामंजस्य करार केला असून, याद्वारे “कम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलीकम्युनिकेशन” या विभागातील विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या मध्ये विद्यार्थ्यांना एप्टिट्यूड स्किल, सॉफ्ट स्किल, इंटरव्ह्यु स्किल, टेक्निकल स्किल इत्यादी प्रकारचे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. यासाठी कंपनीकडून परीक्षा ही घेण्यात आली व त्यामध्ये कर्मयोगीच्या 38 विद्यार्थ्यांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.

   या करारावेळी संस्थेचे विश्वस्त श्री रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, उपप्राचार्य प्रा.जगदीश मुडेगावकर, ट्रेनिंग प्लेसमेंट प्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे आदी उपस्थित होते.

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !