पंढरीतील गुणवंत अभियंत्यांना पुरस्काराने सन्मानित
पंढरपूरः प्रतिनिधी
साई प्रतिष्ठान, योग विद्या धाम पंढरपूर व सावरकर प्रेमी मंडळ या तिन संस्थांनी पंढरपूर मधील गुणवंत अभियंत्यांना पुरस्काराने सन्मानित केले. सदर कार्यक्रम यु- ट्यूब व फेसबुक लाईव्ह आयोजित केला होता.
श्री नंदकुमार डिंगरे, श्री भारत ढोबळे, श्री अशोक ननवरे, श्री उदय उत्पात, श्री मिलिंद वाघ, श्री तानाजी जाधव, श्री अमोल अभंगराव या अभियंत्यासोबत संशोधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ.यशवंतराव यादव व डॉ. अतुल सागडे यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
साई प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. अमरनाथ परदेशी, योग विद्या धाम चे अध्यक्ष श्री. अशोक ननवरे व सावरकर प्रेमी मंडळाचे श्री मोहनजी मंगळवेढेकर तसेच नगरसेवक श्री विवेक परदेशी यांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
अभियंत्यांचे देशाच्या विकासात मोठे योगदान असल्याचे साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अमरनाथ परदेशी यांनी सांगितले तर तांत्रिक कार्याबरोबर अभियंते क्रिडाक्षेत्र, संगीतक्षेत्र, योग व आरोग्य, सामाजिक संघटन व संशोधनात उल्लेखनीय कार्य करीत आहेत असे उदगार श्री अशोक ननवरे यांनी काढले. प्रसिद्ध बासरीवादक अभियंता श्री नंदकुमार डिंगरे यांच्या बासरी वादनाने कार्यक्रमात रंगत आली तर सौ हेमलता यारगट्टीकर, सौ कोमल कुरणावळ व सवीता पिंपळनेकर यांनी सुरेख योग गीत सादर केले.
सदर प्रसंगी सर्व पुरस्कारप्राप्त अभियंते यांनी आपले मनोगते व्यक्त केली. नगरसेवक विवेक परदेशी यांनी सांगितले की, सध्या टेक्नॉलॉजीमध्ये प्रचंड बदल होत असून या बदलाचे सर्व श्रेय अभियंते व संशोधकांना जाते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अमरजा कुलकर्णी यांनी केले, अश्विनी आराध्ये यांनी प्रास्ताविक केले,पाहुण्यांची ओळख सविता पिंपळनेरकर व शितल गुंडेवार यांनी केले तर आभार नगरसेवक विवेक परदेशी यांनी मानले.
श्री किशोर ननवरे, सौ संगीता ननवरे व श्री श्रीनाथ खंदारे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले व कोरोनाच्या पार्वभुमीवर फेसबुक लाईव्ह व युट्युब ला लाईव्ह करण्याचे महत्त्वपुर्ण काम केले.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा