कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यासाठी अत्यंत महत्वाची योजना, जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी लाभ घ्यावा : रोहन परिचारक
पंढरपूर - प्रतिनिधी
स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक विद्यार्थी कल्याण योजनेची घोषणा श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री रोहन परिचारक यांनी केली. कोरोंना महामारीच्या पार्श्वभूमीवर अभियांत्रिकीला प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यानी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन ही श्री रोहन परिचारक यांनी केले.
या योजनेची माहिती देत असताना संस्थेचे विश्वस्त श्री रोहन परिचारक म्हणाले की, समाजकारण हेच केंद्र बिंदु मानून कर्मयोगी परिवाराने आतापर्यत अनेक समाजपयोगी कामे केली आहेत. कोरोंना महामारीमुळे गेले दीड वर्ष लोक आर्थिक संकटामध्ये आहेत. अनेक लोकांचे छोटे मोठे व्यवसाय बंद पडले, नोकर्या गेल्या, लोकांच्या रोजी रोटी चा प्रश्न निर्माण झाला, शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून असणार्याना निसर्गाची ही साथ मिळेना, त्यामुळे शेतीच्या उत्पन्नाचा भरवसा नाही अश्या आर्थिक विवंचने मध्ये असताना केवळ आर्थिक अडचणीमुळे अभियांत्रिकीच्या शिक्षणापासून मुले वंचित राहू नयेत यासाठी कर्मयोगीने मोठे पाऊल उचलून विद्यार्थ्यांच्या कल्याणसाठी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्य स्मरणा निमित्त “स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक विद्यार्थी कल्याण योजना” कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये या वर्षी पासून चालू केली आहे. या योजनेमुळे कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी मध्ये सवलत देण्यात आली आहे व ही सवलत विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत लागू राहणार आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील म्हणाले की, अभियांत्रिकीचे शिक्षण हे महागडे शिक्षण असते आणि त्यातूनच कोरोंनामुळे आर्थिक विवंचंनेमध्ये असल्यामुळे अनेक पालक त्यांच्या मुलांना अभियांत्रीकीच्या शिक्षणापासून दूर ठेऊ शकतात. बारावी नंतर शैक्षणिक आयुष्यातील घेतलेले निर्णय हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरत असतात, त्यामुळे केवळ आर्थिक अडचण म्हणून समाजातील मुले अभियांत्रिकी प्रवेशापासून वंचित राहू नयेत हा या योजनेमागचा प्रमुख उद्देश आहे. अभियांत्रिकीच्या शिक्षणातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवून त्यांचे आयुष्य यशस्वी करण्याचा कर्मयोगी अभियांत्रिकीचा नेहमीचा प्रयत्न असतो. विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन, त्यातून यशस्वी अभियंता बरोबर च एक उत्तम नागरिक तयार करण्यासाठी कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालय हे नेहमीच प्रयत्नशील असते. कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या स्तरावर उत्तम अभियंते, व्यावसायिक, प्रशासकीय अधिकारी म्हणून नावारूपाला येत आहेत. हीच परंपरा चालू राहावी व केवळ आर्थिक प्रश्नामुळे ती थांबू नये यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. समाजाच्या व देश्याच्या उन्नती साठी गुणवत्ता पूर्ण अभियंते निर्माण करून समाज घडणीसाठी व देशाच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांचे योगदान मिळावे याच उद्देशयाने योजनेची घोषणा करण्यात आली आहे.
कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्या सर्व विद्यार्थ्यांना ही योजना अत्यंत उपयोगी आहे व सर्व विद्यार्थ्यानी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. या योजनेच्या अधिक माहिती साठी 9552235854 / 9503763370 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी केले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा