माढा - प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रेरणेने एक पद एक वृक्ष मोहीम, माढा तालुक्यातील आलेगाव बुद्रूक येथे राबविण्यात आली. निसर्ग संवर्धन व्हावे यासाठी हि मोहीम राबवण्यात येत असून, या मोहिमेला प्रतिसाद देताना, माढा तालुक्यातील आलेगाव बुद्रूक, येथे ग्राम विकास अधिकारी बी.आर. लोकरे यांच्या हस्ते आलेगाव बु. येथील भैरवनाथ विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी ग्राम विकास अधिकारी.बी.आर. लोकरे, डि.आर गायकवाड सर, सरपंच पंढरीनाथ चंदनकर, उपसरपंच श्री रामचंद्र पवळ, नुतन ग्रामपंचायत सदस्य बाळासो सोपान चंदनकर, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन देशमुख. किसान क्रांती संघटना, माढा तालुका अध्यक्ष, गणेश कवडे, प्रहार शेतकरी संघटना, विभाग प्रमुख कोंडार भाग जोतीराम राजगुरू, अविनाश चंदनकर ,अनिकेत गाडे, भैरवनाथ शेलार, गणेश शेलार, आदी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा