कर्मयोगी इंजिनीअरिंग कॉलेज, शेळवेचा कॅड स्टेप प्रा. लि. पुणे यांच्याशी सामंजस्य करार
पंढरपूर - प्रतिनिधी
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित, कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालय शेळवे, पंढरपुर व पुणे येथील कॅड स्टेप ड्राफिंग अँन्ड डिझायनिंग प्रा. लि. पुणे यांच्याशी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना स्थापत्य विभागातील अभियांत्रिकी सॉफ्टवेअरसाठी आवश्यक असणारे उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याचा विद्यार्थ्यांना भविष्यात खूप मोठा फायदा होणार असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त श्री रोहन परिचारक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली.
यासंदर्भात माहिती देताना महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल बाबर म्हणाले की, स्थापत्य अभियांत्रिकी संबंधित STADD Pro, E-Tab, Tekla, SAFE2006,SAP200, Revit, 3D More, BIM, LUMION इ. सॉफ्टवेअरचे अद्ययावत ज्ञान विद्यार्थ्यांनी या सामंजस्य कराराद्वारे अवगत करून घ्यावे. सॉफ्टवेअरचे ज्ञान अवगत झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगार निर्मिती करण्याचे काम सामंजस्य कराराप्रमाणे संबंधित कंपनी करणार आहे. तसेच कर्मयोगी ची पहिली विद्यार्थिनी कुमारी प्रियांका माने हिची Unity Group, Pune येथे सिनियर डिझाईन इंजिनिअर म्हणून निवड करण्यात आली. अशाप्रकारे इतर विद्यार्थ्यांनाही या कराराचा फायदा होईल असा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी व्यक्त केला.
करार करतेवेळी संस्थेचे विश्वस्त श्री रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, उपप्राचार्य प्रा. जगदीश मुडेगावकर, स्थापत्य विभागप्रमुख प्रा. अनिल बाबर, तसेच स्थापत्य विभागातील प्रा. प्रदीप झांबरे, प्रा. अतुल सुतार, प्रा. सागर पवार व सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा