एकात्मिक बाल विकास सेवा योजना मोहोळ - दशसूत्री कार्यक्रमाचे आयोजन

प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली 01 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2021 दरम्यान कार्यक्रम 

mahila balkalyan seva yojana, goveranment of maharashtra, mohol, shivshahi news

एकात्मिक बाल विकास सेवा योजना मोहोळ प्रकल्प अधिकारी श्री किरण सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 01 सप्टेंबर 2021 ते 30 सप्टेंबर 2021 मध्ये दशसूत्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे 

त्यामध्ये औपचारिक उद्घाटन बालकांचे लसीकरण जलपूर्ती पाणी निर्जंतुकीकरण विषयी माहिती ग्रह भेटीमध्ये गरोदर मातेशी संवाद व त्यांना आहाराविषयी मार्गदर्शन व स्तनदा मातांशीं संवाद त्यांना स्तनपानाचे महत्त्व व कमी वजनाच्या मुलांना आहार वाटप बालकांचे लसीकरण व अनौपचारिक शिक्षण कार्यक्रम त्याचप्रमाणे सॅम मॅम शोध मोहीम दत्तक पालकांकडून मुलांना खाऊ वाटप

सांस्कृतिक कार्यक्रम व फॅशन शो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पाटकुल गावचे सुपुत्र प्रभाकर उर्फ दिनकर भैया साहेब देशमुख तसेच पाटकुल गावचे प्रथम नागरिक व विद्यमान व कर्तव्यदक्ष सरपंच आदरणीय शिवाजी संदिपान भोसले महाराज तसेच पाटकुल गावचे उपसरपंच आदरणीय श्री गणेश नामदे व त्याचप्रमाणे पाटकुल गावचे पाटकुल ग्रामपंचायतचे विद्यमान सर्व सदस्य पाटकुल ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य श्री अनिल दादा वसेकर मेंबर तसेच विद्यमान सदस्य श्री अरविंद काळे तसेच मनीषा सुतार मॅडम रूपाली गोडाळे मॅडम व पाटकुल ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी (लेडी सिंघम)केवळे मॅडम तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना मोहोळच्या विस्तार अधिकारी आदरणीय शीलादेवी दाढे मॅडम तसेच राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते ISO नामांकन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटकुल चे मुख्याध्यापक श्री नंदकुमार वसेकर सर व पाटकुल बीट -२ च्या पर्यवेक्षिका आदरणीय सुवर्णा माशाळे मॅडम व पाटकुल बीट-१ च्या पर्यवेक्षिका आदरणीय वासंती सुरवसे मॅडम व प्राथमिक आरोग्य केंद्र पाटकुल च्या आशा वर्कर् रंजना टोणपे मॅडम व उपस्थित सर्व पालक व स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्व बालक व मुली त्याचप्रमाणे पाटकुल च्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होते.

तसेच पाटकुल गावचे सुपुत्र आदरणीय श्री दिनकर उर्फ प्रभाकर भैया देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले तसेच पाटकुल गावचे सरपंच आदरणीय व कर्तव्यदक्ष श्री शिवाजी संदिपान भोसले महाराज यांनीही या ठिकाणी मनोगत व्यक्त केले यानंतर ISO नामांकन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटकुल चे मुख्याध्यापक आदरणीय श्री नंदकुमार वसेकर सर यांनीही या ठिकाणी मनोगत व्यक्त केले यानंतर एकात्मिक बाल विकास सेवा योजना मोहोळ च्या विस्ताराधिकारी आदरणीय शीलादेवी दाढे मॅडम यांनीही मनोगत व्यक्त केले तसेच पाटकुल बीट-२ च्या पर्यवेक्षिका आदरणीय सुवर्णा माशाळे मॅडम यांनीही या ठिकाणी मनोगत व्यक्त केले तसेच यानंतर पाटकुल बीट १ च्या पर्यवेक्षिका आदरणीय वासंती सुरवसे मॅडम यांनीही या ठिकाणी मनोगत व्यक्त केले यामध्ये प्रस्तावना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या पाटकुल बीट- २ च्या पर्यवेक्षिका आदरणीय सुवर्णा माशाळे मॅडम यांनी केले आहे व आभार प्रदर्शन एकात्मिक बाल विकास सेवा योजना मोहोळ पाटकुल बीट-१ च्या पर्यवेक्षिका आदरणीय वासंती सुरवसे मॅडम यांनी केले आहे व सूत्रसंचालन स्वरा अँकरिंग जीवन घोडके यांनी केले आहे

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !