शेतकऱ्यांच्या हितासाठी समृद्धी ट्रॅक्टर सदैव सोबत असेल:- चेअरमन अभिजीत पाटील.
![]() |
नुतनीकरण शुभारंभ करताना मान्यवर |
सांगोला प्रतिनिधी -
सांगोला तालुक्यात समृद्धी ट्रॅक्टर्सचा नूतनीकरण समारंभ सांगोल्याचे आमदार श्री.शहाजीबापू पाटील, मा.आमदार श्री.दीपक आबा साळुंखे-पाटील, युवा नेते श्री.बाबासाहेब देशमुख, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.
सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील, मा. आमदार दिपक आबा साळुंखे-पाटील, जि.प.सदस्य अतुल पवार या प्रमुख मान्यवरांनी याप्रसंगी शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले.
भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. तर शेतकरी हा इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. समृद्धी ट्रॅक्टरच्या माध्यमातून सांगोला येथील शोरूम नूतनीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतकऱ्यांचे आर्थिकमान उंचवण्यासाठी ग्राहक हाच आपला मुख्य मानून समृद्धी ट्रॅक्टर कार्यरत आहे. देशात दुसरा तर राज्यात पहिला क्रमांकावर समृद्धी ट्रॅक्टर अग्रेसरवर असून पुढील काळातही सेवा देण्याचे काम करीत राहील असा विश्वास धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला.
![]() |
ग्राहकाला चावी प्रदान करताना मान्यवर |
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष श्री.श्रीकांत देशमुख, जि.प.सदस्य श्री.अतुल पवार, व्हा.चेअरमन श्री.विश्वनाथ चव्हाण, जेष्ठ संचालक श्री.शहाजी नलावडे, सोनालिका ट्रॅक्टरचे श्री.बलजिंदर सिसोदिया सर, श्री.सुबोधकुमार शर्मा सर, धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.अमर पाटील, संचालक श्री.अभिजीत कदम, श्री.सुरेश सावंत, मॅनेजर श्री.सोमनाथ केसकर, श्री.मोरे, युवा नेते श्री.अभिजीत नलावडे, यासह शेतकरी,ग्राहक मान्यवर उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा