गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे, आणि शिवसेना, यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. नारायण राणे आणि त्यांची दोन मुलं निलेश आणि नितेश हे, शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तर शिवसेनेचे संजय राऊत, यांच्यासह अनेक नेते, राणे कंपनीला टार्गेट करत असतात. हा वाद आता इतका विकोपाला गेला आहे, की एकमेकांची लायकी काढण्यापासून ते थोबाडीत लावण्यापर्यंत चे सर्व शब्द प्रयोग होत आहेत. एकेकाळी जिगरी दोस्त असलेले राजकीय पक्ष, आता एकमेकांचे जानी दुश्मन बनले आहेत.
सर्वच पक्षाचे नेते अशी भाषा वापरत आहेत
परंतु हे फक्त या दोन पक्षांपुरतेच मर्यादित आहे का? या प्रश्नाचे उत्तर नाही असेच मिळते. राज्याच्या राजकारणाची दिशाच अशी झाली आहे की, एवढ्या तेवढ्या कारणावरून एकमेकांचा एकेरी उल्लेख करणे, लायकी काढणे औकात दाखवणे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन थोबाडीत लगावणे थप्पड मारणे कोथळा काढणे अशी भाषा आजच्या राजकारणात नित्य ऐकू येते आहे प्रत्येक पक्षातील काही नेते मंडळी या सर्व प्रकाराने रोजच चर्चेत आहेत संजय राऊत नाना पटोले रूपालीताई चाकणकर नारायण राणे अशा सर्वच पक्षांचे मान्यवर नेते मंडळींनी वरील प्रमाणे भाषा वापरली आहे इतकंच नव्हे तर राज्याचे प्रमुख म्हणून बसलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा थप्पडची भाषा वापरली आहे यातून काय साध्य होणार आहे हे फक्त या नेतेमंडळींनाच माहित . जनता मात्र या मोठमोठ्या नेत्यांचा हा बालिशपणा पाहून त्रस्त होत आहे
स्थानिक नेते अनुकरण करत आहेत
या मोठ्या नेत्यांचे हे वाद दररोज चिघळत असताना हे लोण आता स्थानिक पातळीवर पोहोचले आहे जिल्हा आणि तालुकास्तरावरचे नेते देखील अशीच भाषा वापरताना दिसत आहेत महाराष्ट्रात सध्या सगळीकडे हीच परिस्थिती आहे सर्वच पक्षांचे नेते सध्या एकमेकावर चिखलफेक करत आहेत
सोलापुरातील घटनेचे उदाहरण
परवा सोलापुरात ओबीसी आरक्षणासंदर्भात भाजपने आंदोलन केले त्यावेळी अतिउत्साहाच्या भरात भाजपा कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून ही घटना टाळली असली तरी यामुळे शिवसेना नेते आणि कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. वास्तविक आंदोलन करणे हा लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे शिवसेना हा पक्ष तर आंदोलनातूनच मोठा झालेला आहे मात्र सत्तेवर येताच विरोधकांच्या आंदोलनाचा अधिकारच अमान्य करण्याची प्रवृत्ती आता शिवसेनेत बळावते आहे.
शिवशेनेचे पुरुषोत्तम बरडे यांनी भाजपा जिल्हाध्यक्षांना दिली धमकी
शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना फोन करून दम भरला आहे. हा फोन कॉल सध्या सोलापूरसह महाराष्ट्रात व्हायरल झाला आहे. त्या फोन कॅलमधील दोन्ही नेत्यांचे संभाषण ऐकून आपण यांना नेते म्हणतो याची आपल्यालाच लाज वाटेल. संपूर्ण संभाषांत कुठेही मुद्द्यांवर चर्चा नाही.
जनतेच्या कामाचे आणि प्रश्नांचे काय ?
एकूणच जनतेच्या सेवेचे व्रत घेऊन राजकारण करण्याचा दावा करणारी ही नेते मंडळी छोट्या मोठ्या कारणांवरुन हमरी - तुमरीला येत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांची चांगलीच करमणूक होत असली तरी जनतेच्या कामाचं काय? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो आहे
सचिन कुलकर्णी
संपादक शिवशाही न्यूज
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा