जनहित शेतकरी संघटनेचे रस्ता रोको आंदोलन
![]() |
निवेदन देताना जनहित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते |
मोहोळ - प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तालुक्यातील मौजे पेनुर येथे पंढरपूर मोहोळ रोड वरती भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनातील मागण्या गेल्या दीड वर्षापासून मोहोळ तालुक्यातल्या 95 गावच्या शेतकऱ्यांची अतिवृष्टी मधील पिके व बागांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली परंतु पेनुर पाटकुल खंडाळी या गावच्या शेतकऱ्यांची पिकांची व बागेची नुकसानभरपाई गेल्या दीड वर्षापासून अद्याप अन्यायग्रस्त बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले नाही तसेच कोण्हेरी येथील 58 शेतकऱ्यांची दोन वर्षापूर्वीची अवकाळी पावसाने झालेली पिकांची व बागांची नुकसान भरपाई अध्याप शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली नाही या चाललेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शासनाचे व ज्यांची जबाबदारी आहे ते आमदार यशवंत माने यांचे लक्ष वेधण्यासाठी आज दिनांक 7 वार मंगळवार रोजी ठीक बारा वाजता पेनुर येथे शिवाजी चौकात एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले
याप्रसंगी बोलताना प्रभाकर देशमुख म्हणाले शेतकरी गेल्या दीड वर्षापासून कोरूना व लॉकडाऊन मुळे आर्थिक संकटात सापडले असताना एकीकडे उसाची बिल तीन-तीन चार-चार महिने कारखानदार देत नाहीत शेतीमालाला भाव नाही ज्या शेतकऱ्यांनी मतदान करून राज्यकर्त्यांना खुर्च्या दिल्या त्यांना या समस्यांचे काही देणे घेणे नाही ज्या शेतकऱ्यांनी खुर्च्या दिल्यात त्या खुर्च्या काढून घ्यायची ताकत माझ्या शेतकर्यात आहे हेमलकसा आघाडीच्या नेत्यांनी विसरून चालणार नाही अशा परिस्थितीत गेल्या दीड वर्षात खाली झालेल्या अतिवृष्टी ची नुकसान भरपाई मोहोळ तालुक्यातील महत्त्वाची गाव पेनुर पाटकुल खंडाळी कोण्हेरी येथील शेकडो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यापासून पासून वंचित ठेवण्याचे कटकारस्थान संबंधित महसूल अधिकाऱ्याकडून केले जात आहे या मनमानी कारभाराचा भांडाफोड करण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेने आज रास्ता रोको आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पुढे बोलताना देशमुख म्हणाले 5 ऑक्टोंबर च्या आत शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर जमा करावी अन्यथा मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत माने यांना पेनुर पाटकुल या भागात पाय ठेवू देणार नाही प्रसंगी मोहोळ तहसील कार्यालयाला कुलूप ठोकून जाब विचारू याची जबाबदारी नोंद घ्यावी असेही त्यांनी ठणकावून सांगितले यावेळी आंदोलकांचे निवेदन नायब तहसीलदार यादव साहेब व मोहोळ चे पोलीस निरीक्षक मा अशोक सायकर साहेब यांनी स्वीकारले या वेळी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता या आंदोलनात पेनुर चे हरिभाऊ चौरे रंजीत चौरे ग्रा प सदस्य विठ्ठल माने बाळासाहेब पाटील लक्ष्मण शितोळे हरिभाऊ लोंढे संदीप जरग शिवाजी वसेकर लक्ष्मण बाबा काळे दिगंबर जाधव बारीकराव काळे ग्रा प सदस्य अरविंद काळे अनिल वसेकर अल्ताफ भाई पटेल पापा पवार इतके ते असंख्य शेतकरी उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
bhaiya deshmukh talmalicha karykarta
ReplyDelete