maharashtra day, workers day, shivshahi news,

अखिल भारतीय मानव अधिकार संघटन नियुक्ती प्रदान सोहळा सम्पन्न


Human rights, pune, New incumbent, shivshahi news
अखिल भारतीय मानव अधिकार संघटन नवीन पदाधिकारी

पुणे / कोथरूड - प्रतिनिधी 

अखिल भारतीय मानव अधिकार संघटन नवीन पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते सन्मान सोहळा दि.22.8.2021 रोजी दुपारी 12.30 वाजता कुमार परिसर क्लब हाऊस कोथरूड येथे सम्पन्न झाला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कायदेशीर सल्लागार ऍड.भूषण पाटील ,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सरचिटणीस सत्यशोधक रघुनाथ ढोक ,परि संघटनेच्या अध्यक्षा निर्मला कुऱ्हाडे आणि संस्थेचे अध्यक्ष शिवदासजी महाजन उपस्थित होते.

यावेळी अखिल भारतीय मानव अधिकार संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून सौ निर्मलाताई कुऱ्हाडे, मावळ तालुका चे अध्यक्ष नारायण वावरे,सचिव सचिन ठाकर , मावळ तालुका युवक अध्यक्ष म्हणून सुधीर दहीभाते यांची नियुक्ती पत्र व प्रमाणपत्र अध्यक्ष शिवदासजी महाजन, ऍड.भूषण पाटील, सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते देण्यात आले.तर कोव्हिडं च्या काळात विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करून चांगली सेवा केली म्हणून सत्यशोधक रघुनाथ ढोक,सौ.मुबिना शेख, पत्रकार सुभाष भोते,नागनाथ लष्करे,चंद्रकात हलगरे ,सौ.मैमुदा गोऱ्हे यांचा पुरस्कार सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आले.

यावेळी ऍड.भूषण पाटील म्हणाले की या हुमन राईट्सचे काम महाराष्ट्र पुरते मर्यादित नसून इतर राज्यात देखील मोठे आहे. या संघटनेचे माध्यमातून मानवाला कायदेशीर मदत करून त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे.यासाठी आपण जागृत रहाणे अत्यन्त गरजेचे आहे.

यावेळी सत्यशोधक ढोक म्हणाले की आपण सर्वत्र सामाजिक कार्य करीत असताना लोकांना अंधश्रद्धा, कर्मकांड यातुन देखील बाहेर काडून सत्यशोधक विवाह चळवळीच्या माध्यमातून आर्थिक उधळपट्टीला आळा घालत विवाह प्रित्यर्थ अनाथ, विकलांग ,वृद्धाश्रम यांना मदत करून सामाजिक कार्य करावे असे आवाहन करणे जरुरीचे आहे. तसेच या कामी तरुण पिढी पुढे आली तर लोकांचे नक्कीच प्रबोधन होईल असे देखील ढोक म्हणाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाषण करताना शिवदासजी महाजन म्हणाले की लोकांना त्यांच्या न्याय हक्काची जाणीव करून देत अनेक प्रश्न या संस्थेच्या माध्यमातून सोडविले असून या संस्थेचे कार्य महाराष्ट्र ,भारत पुरते मर्यादित नसून या संस्थेचे कार्य लंडन,बांगलादेश,पाकिस्तान असे 35 देशात करीत आहे.त्यामुळे नवीन पिढीला या संस्थेच्या माध्यमातून मोठे कार्य करता येईल.कोव्हिडं च्या काळात पिंपरी,चिंचवड परिसरात कामगारांना मोठे प्रमाणात अन्नदानाची सोय करून देखील विशेष कार्य या संस्थेने नुकतेच केले आहे.

या कार्यक्रमाचे संयोजक सौ.निर्मला कुऱ्हाडे यांचा वाढदिवस असल्याने हुमन राईट्स च्या वतीने केक कापून वाढदिवस साजरा केला तर सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी सर्वाना कुऱ्हाडे यांचे वाढदिवसाच्या व रक्षाबंधन निमित्ताने सर्वाना महात्मा फुले गीत चरीत्र व थोर ऐतिहासिक शूर महिला हे पुस्तके भेट देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.मुबिना शेख तर आभार प्रदर्शन पत्रकार सुभाष भोते यांनी मानले.

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !