maharashtra day, workers day, shivshahi news,

गांधीजींची तीन माकडे देशाला आदर्श होती: महा विकास आघाडीची तीन माकडे राज्याला घातक आहेत: प्रभाकर भैया देशमुख

23 ऑगस्ट रोजी भैया देशमुख करणार  पंढरपुरात आंदोलन - दखल न घेतल्यास काढणार रुमणे मोर्चा

mahavikas aghadi ,prabhakar bhaiya deshmukh, andolan, pandharpur, shivshahi news

पंढरपूर - प्रतिनिधी

 सत्तेत येण्याआधी शेतकऱ्यांच्या शेतीसाठीची वीज माफ करतो म्हणणारे सरकार तसेच कोरोना काळातील वीज बिले माफ करतो म्हणणारे सरकार आज शेतीपंप चे ट्रांसफार्मर सोडवत शेतकरी व व्यापारी यांच्यावर अन्याय व अत्याचार करत असल्याचा असा घणाघात प्रभाकर भैया देशमुख यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. भारतातील दिल्ली व तेलंगणा या राज्यात वीज मोफत दिली जाते मंग महाराष्ट्रात का नाही असाही सवाल या निमित्त प्रभाकर भैय्या देशमुख यांनी उपस्थित केला आहे .

सर्व गोष्टी लक्षात घेऊन अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व सरकारला जाग येण्यासाठी,    गांधीजींची तीन माकडे देशाला आदर्श होती. परंतु महा विकास आघाडीची तीन माकड राज्याला घातक आहेत. असाही आरोप महाविकासआघाडी वरती प्रभाकर देशमुख यांनी केला आहे. देशमुख पुढे बोलताना म्हणाले 

  • उद्धव साहेब म्हणतात शेतकऱ्यांना करंट देऊन मारा मी तोंडातून एक ब्र शब्द काढणार नाही तोंडावर हात ठेवणार 
  • अजितदादा पण म्हणतात शेतकरी मेला तरी आक्रोश माझ्या कानावर येऊ नये म्हणून मी बी कानावर हात ठेवलेला काढणार नाही आणि 
  • बेजबाबदार ऊर्जामंत्री म्हणतात कनेक्शन तोडल्यामुळे शेतकरी मेला तरी मी डोळ्याने बघणार नाही मी डोळ्यावर हात ठेवून बसणार 

असाही तीन माकडांचा खुलासा प्रभाकर देशमुख यांनी केला आहे 

सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुके व पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील बंद केलेला विद्युत पुरवठा सुरळीत चालू करण्याचे मागणीसाठी पंढरपूर येथील वि दा सावरकर पुतळ्याजवळ सोमवारी दि.23 /8 /20 21 रोजी ठीक बारा वाजता तीन माकडांच्या भूमिकेचे प्रदर्शन आंदोलन करणार असल्याची माहिती देशमुख यांनी पत्रकारांना बोलताना दिली 

 जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वेगवेगळ्या आंदोलनाने शासनाचे लक्ष वेधून घेणारे आक्रमक आंदोलक प्रभाकर भैया देशमुख यांनी जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी अधीक्षक अभियंता महावितरण व पोलीस स्टेशन कार्यालयामध्ये निवेदन दिले आहे या निवेदनात असे म्हटले आहे की, मा. मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी सत्तेवर येण्याआधी महाराष्ट्र राज्यातील शेतक-यांचे सरसकट वीज बील माफ करतो असा शब्द मिडीया व दैनिकांच्या माध्यामातून तमाम राज्यातील जनतेला दिला होता,त्याचे पुरावे जनहीत शेतकरी संघटनेकडे आहेत. तो दिलेला शब्द पाळला नाही. गेल्या दीड वर्षे पासून शेतकरी भयानक आर्थिक संकटात आहे. शेतकरी संकटात असल्याने व्यापाऱ्यांचा व्यापार ठप्प झालेला आहे त्यामुळे या सर्वांचे लॉकडाउन काळातील बील शंभर टक्के माफ करावे तसेच गेल्या चार ते पाच दिवसापासून सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुके व पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील शेतीपंपाचा विदयुत पुरवठा बंद केला आहे. तो त्वरीत चालू करून संकटात असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा दयावा. अन्यथा या दोन्ही महत्त्वाच्या मागण्यासाठी सावरकर पुतळा जवळच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास अधीक्षक अभियंता महावितरण सोलापूर या कार्यालयावर ती रुमणे मोर्चा काढून जनहित शेतकरी संघटना जाब विचारणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !