![]() |
स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी काँग्रेस कार्यकर्ते |
भारताला एकविसाव्या शतकाकडे झेपावण्यासाठी तंत्रज्ञानपूरक दृष्टिकोन देणारे, युवकांचे प्रेरणास्थान ठरलेले आणि खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे शिल्पकार ठरलेले राजीवजी! प्रेम, शांती, संस्कृती, संयमाची प्रचिती देणारे आणि देशाप्रती त्याग, कर्तव्यनिष्ठतेचे सर्वोच्च प्रतीक ठरलेले असे दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी यांची जयंती निमित्त पंढरपुर काॅंग्रेस कमीटीच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे जयंती साजरी करण्यात आली यावेळी स्वर्गिय पंतप्रधान मा. राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेला ज्येष्ठ नेते श्री नागेश आधटराव यांच्या हस्ते पुष्पहार घालून प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांमध्ये काँग्रेस कमिटीची शहराध्यक्ष राजेश भादुले, ओबीसी जिल्हाध्यक्ष समिर कोळी,जिल्हा सरचिटणीस नागेश गंगेकर,देवानंद ईलकर,सुहास भाळवनकर,मिलींद आढवळकर,जिल्हा कार्याध्यक्ष शंकर सुरवसे,शहर कार्याध्यक्ष सागर कदम,आमित आवघडे,सेवादल शहराध्यक्ष गणेश माने,अमर सुर्यवंशी,हणुमंत मोरे,द बडवे,महाविर धोडमीसे,हणुमंत घाडगे व ईतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा