खा. नारायण राणे यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद
![]() |
M.P. Narayan Rane become central minister |
खासदार नारायण राणे सातत्याने विद्यमान महा विकास आघाडी सरकारला विविध प्रश्नांवर धारेवर धरत असतात . नारायण राणे आणि त्यांची दोन्ही मुलं निलेश आणि नितेश हे देखील सरकारच्या धोरणांवर टीकेची झोड उठवत आहेत . विशेषतः शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख तथा मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या लक्ष्य स्थानी असतात. या सर्वाचे फळ राणे यांना मिळाले असून खा. राणे यांना मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रीपद दिले आहे. भारतीय जनता पक्षाचा आक्रमक नेता म्हणून नारायण राणे यांना मंत्रीपद मिळणारच हे महाराष्ट्रातील जनतेने गृहीतच धरले होते त्याप्रमाणे काळ त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले आहे. काल मंत्रिपदाची शपथ घेतलेले खा. राणे यांना नरेंद्र मोदी सरकारमध्ये लघू व मध्यम उद्योग मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आज सकाळी ११. वाजता ते मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत . कॅबिनेट मंत्री म्हणून संधी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत. नारायण राणे यांना मंत्री बनवून भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात महाविकास आघाडीला शह देण्याचा प्रयत्न केला असून , खा. नारायण राणेंच्या मंत्रिपदाचा भा.ज.पा ला महाराष्ट्रात किती फायदा होणार हे पाहणे ठरणार आहे.
खा. नारायण राणे यांचे कोकणात चांगलेच प्रस्थ आहे, आणि कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे त्यामुळे खा. राणेंच्या माध्यमातून कोकणात शिवसेनेला शह देत भाजपाला वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विचारपूर्वक रणनीती आखली गेली आहे. त्यामुळेच राणे यांना मंत्रिपद दिल्याने सर्वात जास्त शिवसेना विचलित झाली असून खा. संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्या मंत्रिपदावर केलेले भाष्य त्याचेच उदाहरण आहे. एकंदरीतच नारायण राणे, नितेश राणे,आणि निलेश राणे यांनी महाराष्ट्रात शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जो सामना रंगवला होता त्याचा गुलाल आज दिल्लीत उधळला गेला आहे. खा. नारायण राणे यांनी शिवसेनेशी घेतलेला पंगा त्यांच्यासाठी दिल्लीत चंगा ठरला आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा