सोलापूरच्या लक्ष्मी शिंदेच्या जिद्दीची कहाणी
अपंगत्वावर मात करून परीक्षेत मिळवले यश
जन्मताच दोन्ही हात नसूनही नशिबाला दोष देत ती बसली नाही. तर कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पायांचा हातांसारखा वापर करण्याचे कसब आत्मसात केले. रायटरची मदत न घेता शिक्षण घेत अनेक परीक्षेत यश देखील मिळवले. त्याच बरोबर पायाने चित्र काढण्याची कला देखील अवगत केली आहे.
ही कहाणी आहे सोलापूरच्या लक्ष्मी शिंदे या तरुणीची. निसर्गाने जन्मतःच लादलेल्या अपंगत्वावर मात करून लक्ष्मीने पायाने लिहीण्याचा सराव केला. त्यात ती इतकी पारंगत झाली आहे, की आजपर्यंत एकाही परीक्षेत रायटर्सची मदत घेतली नाही आणि अनेक परिक्षेत यश संपादन केले, आणि आता ती स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहे. या सोबतच पायाने चित्र काढण्याची कला सुद्धा अवगत केली आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने तिने पायाने श्री विठ्ठलाचे सुंदर चित्र रेखाटले आहे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल भक्तांनी पंढरपूरला गर्दी न करता घरूनच विठ्ठलाची आराधना करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन लक्ष्मीने केले आहे.
लक्ष्मीच्या जिद्दीला शिवशाही न्यूज नेटवर्क सलाम करते
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा