शासकीय जमीन हडप केल्याचा आरोप
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तपास करणार
![]() |
Former Mayor manohar sapate |
सोलापूर - ( शिवशाही वृत्तसेवा )
महानगरपालिकेच्या ताब्यात असलेली, कोट्यावधींची जमीन, महापौर पदाचा वापर करून हडप केल्याप्रकरणी, माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. माजी महापौर मनोहर गणपत सपाटे, आणि लता सुदाम जाधव, यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी योगेश नागनाथ पवार यांनी, सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 20 मार्च 1993 , ते 20 मार्च 1994 , या कालावधीत मनोर सपाटे हे सोलापूर महानगरपालिकेचे महापौर होते. सपाटे हे सन 1991 पासून ते आजतागायत, यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या संस्थेला अभिषेक नगर, मुरारजी पेठ, येथील फायनल प्लॉट क्रमांक 106, क्षेत्र 7863 चौरस मीटर, ही जागा, स्वतः अध्यक्ष असलेल्या संस्थेला देण्यासाठी, शासनाचा आदर्श नियमांचा भंग केला. 20 जुलै 1993 रोजी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतील, ठराव क्रमांक 172, बेकायदेशीरपणे शैक्षणिक वापर करण्यासाठी संस्थेत जागा देण्याचा ठराव मंजूर करून घेतला. त्यावेळी ती मिळकत जमीन, हि नगरपालिकेच्या नावे किंवा प्रत्यक्ष कब्जे वहिवाटीत नव्हती. त्यावेळी त्या मिळकतीबाबत मुंबई उच्च न्यायालयात दावा चालू होता.
या बाबत मनोहर सपाटे यांना पूर्ण माहिती असून सुद्धा, सपाटे यांनी महापौर पदाचा गैरवापर, स्वतःच्या हितासाठी केला. प्रशासनावर दबाव टाकून, श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ, या संस्थेच्या शाळेला, शैक्षणिक मान्यता मिळाली नसतानाही, संस्थेला फायदा होण्यासाठी ठराव मंजूर करून घेतला. हा ठराव मंजूर झाल्यानंतर शाळा मान्यतेसाठी महाराष्ट्र शासनाकडून शिक्षण व सेवा योजना विभागाकडे, 19 एप्रिल 1994 रोजी लेखी अर्ज केला. त्यानंतर 10 जानेवारी 1995 रोजी, या संस्थेस शाळेची मंजुरी मिळाली. त्यानंतर उच्च न्यायालयाने ही मिळकत 24 जानेवारी 1995 रोजी, महानगर पालिकेच्या ताब्यात दिली.
त्यावेळी तिची किंमत पंधरा कोटी रुपये होती. संस्थेची आर्थिक परिस्थिती नसल्याने, मनोहर सपाटे यांनी महापौर पदाचा गैरवापर करून, या जमिनीचे शासकीय किमतीनुसार पैसे भरण्याचे मान्य केले. मात्र तीन लाख 75 हजार इतकी रक्कम, न भरता खोटी पावती करून दाखवली, आणि 26 जुलै 1995 रोजी, खरेदी दस्त अन्वये खरेदी केली. ही जागा खरेदी करताना, संस्थेचे सदस्य नसताना, खरेदी खतावर संस्थेचे सचिव म्हणून, लता जाधव, यांनी सही करून, मनोज सपाटे यांच्या गैरकारभाराला मदत केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक, कविता मुसळे या करत आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा