मंगळवेढा येथील नूतन मराठी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावर्षी उज्वल यश मिळवले
![]() |
nutan marathi madhyamik vidyalaya, mangalvedha |
राज सारवडे, मंगळवेढा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे यांच्यावतीने इ १ं० वि चा निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात आला. मंगळवेढा येथील नूतन मराठी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावर्षी उज्वल यश मिळवले. प्रशालेत प्रथम क्रमांक मंगेश गुरुलिंग पाटील व कु.वैष्णवी आनंद इंगळे यानी ९७.२० % गुण ,द्वितीय क्रमांक चेतन संजय खडतरे ९५.६० % गुण तृतिय क्रमांक कु.नम्रता दगडू फटे ९५.२० % गुण, चतुर्थ क्रमांक कु.पल्लवी नवनाथ गायकवाड ९४.८० % गुण, पाचवा क्रमांक कु.श्रेया सुहास जोशी ९२.२० % गुण मिळवत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षीही प्रशालेचा सलग दुसऱ्या वर्षी निकाल १००% लागला असून, ज्यामध्ये ३२ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी, २३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, तर ३ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीत यश मिळवले.
यंदा कोरोनाच्या पाश्वभूमीमुळे इ ९ मधील ५० % गुण व इ १० वी मधील अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक गुरनिंग बंडगर, सुभाष गायकवाड, योगेश कुलकर्णी, विठ्ठल जमखंडी,अवंती पटवर्धन, श्रीराम पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षकांनी ऑनलाइन व ऑफलाईन केलेलं मार्गदर्शन, घेतलेला सराव, दररोजच्या टेस्ट यामुळे विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थाअध्यक्ष प्रा आर. एन. कुलकर्णी, उपाध्यक्षा निर्मला ताई पटवर्धन, सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी, संचालक आप्पासाहेब महालकरी, सुरेश जोशी, मुख्याध्यापक गुरनिंग बंडगर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुनीता औताडे सर्व संचालक, संचालिका, शिक्षक, शिक्षिका, पालक, विद्यार्थी यांनी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा