समाधान ! तू नावाप्रमाणेच समाधानी दिसत आहेस
![]() |
आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना, श्री विठ्ठल आणि श्री संत दामाजी यांच्या मूर्ती, भेट दिल्या |
" समाधान! तू नावाप्रमाणे समाधानी आहेस, जनतेची कामे मन लावून करा", हे उदार आहेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे. आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री, सोमवारी सहकुटुंब, पंढरपुरात आले होते. मंगळवारी पहाटे, त्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली, आणि मुंबईकडे रवाना झाले. कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या या पंढरपूर दौऱ्याच्या वेळी लोकप्रतिनिधी किंवा पक्षाचे पदाधिकारी यांना कुणालाही मुख्यमंत्र्यांना भेटण्याची परवानगी नव्हती. मात्र मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः नवनिर्वाचित आमदार समाधान अवताडे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला, आणि भेटायला बोलवले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आमदार समाधान आवताडे शासकीय विश्रामगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आले. यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना, श्री विठ्ठल आणि श्री संत दामाजी यांच्या मूर्ती, भेट दिल्या.
![]() |
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार समाधान आवताडे यांची पाठ थोपटली |
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार समाधान आवताडे यांना शुभेच्छा देताना, आपल्या खास ठाकरी शैली मध्ये, "समाधान ! नावाप्रमाणेच समाधानी दिसत आहेस, लोकांच्या हितासाठी चांगली कामं करा", असे उद्गार काढले आणि आमदार समाधान आवताडे यांची पाठ थोपटली. सध्या समाधान आवताडे भाजपाचे आमदार असले तरी, पुर्वी ते शिवसेनेत होते आणि 2014 ची निवडणूक त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावरच लढवली होती.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा