![]() |
shri vitthal rukmini |
![]() |
CM Udhhav thakare with family at pandharpur |
आषाढी एकादशी मोठा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आध्यात्मिक सोहळा आहे. महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी असलेले आणि दक्षिणकाशी समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्नी सौ. रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे हे पूजेला बसले होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि पूजेचा मान मिळालेले वारकरी दाम्पत्य हे सुद्धा उपस्थित होते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री मुंबईहून स्वतः गाडी चालवत कुटुंबासह पंढरपूरला आले होते. पहाटे दोन वाजता शासकीय महापूजा झाली. यावेळी "दिंड्या पताकांनी गजबजलेले पंढरपूर मला पुन्हा पाहायचे आहे, देवा ! महाराष्ट्रावरचे आणि संपूर्ण जगावर चे हे कोरूना चे संकट लवकर जाऊ दे", असे मागणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्री विठ्ठल चरणी केले आहे.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले
![]() |
ashadhi ekadashi- CM udhhav thakare at vitthal rukmini temple pandharpur |
मी भाग्यवान आहे, मला एवढ्या जवळून महापूजेचा बहुमान मिळाला . लाखो भक्त येतात त्यातले अनेक जण मंदिरात सुद्धा येऊ शकत नाहीत. कित्येक मैल चालत येतात, दुरूनच कळसाचे दर्शन घेतात आणि पुन्हा आपल्या घराकडे परत जातात. ती भक्ती , त्या भक्तीवरच आपला महाराष्ट्र आणि आपले राज्य उभा आहे. एका भक्कम पायावर उभा आहे. भक्ती पाहिजे, विश्वास पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे . आणि हा आत्मविश्वासच संकटातून मार्ग काढत असतो. मी काय मोठं फार केलेले नाहीये. एक मी माझ्या परीने दहा वर्षांपूर्वी पुस्तक काढलं होतं. 'पहावा विठ्ठल' तेव्हा पंढरपूरला प्रदक्षिणा घातली होती आणि अथांग पसरलेला भक्ति सागर पाहिला होता. माझ्या मनात तेव्हा पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती, की हा आजचा बहुमान मला मिळेल मात्र तो बहुमान मिळत असताना, पूर्वापार चालत आलेले एक चित्र आहे, तुडुंब भरलेलं पंढरपूर आनंदी पंढरपूर , रंगाची उधळण असते, आणि कपडे रंगीबेरंगी, भगवा पताका नाचत असतात, ते वातावरण मला परत पाहिजे. लवकरात लवकर ते वातावरण निर्माण होवो अशी मी विठूराया चरणी प्रार्थना करतो.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा