बलिदान दिवसानिमित्त वीर शिवा काशीद यांना अभिवादन
![]() |
वीर शिवबा काशिद यांना अभिवादन |
पंढरपूर - (प्रतिनिधी),
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले, त्यावेळी स्वराज्य निर्मिती करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक निष्ठावंत सहकार्यांनी स्वराज्यस्थापनेच्या या महायज्ञात स्वतःची आहुती दिली आहे. स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या अनेक नरवीरांमध्ये वीर शिवबा काशीद यांचे नाव अग्रक्रमाने येते. पन्हाळ्याच्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका होण्यासाठी वीर शिवबा काशीद यांनी स्वतःचे बलिदान दिले.
अशा वीर पुरुषांच्या बलिदान दिवसानिमित्त पंढरपूर शहर राष्ट्रीय नाभिक संघटनेच्या वतीने वीर शिवबा काशीद यांना अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय नाभिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश चव्हाण यांच्या हस्ते, वीर शिवबा काशीद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी पंढरपूर शहर राष्ट्रीय नाभिक संघटनेचे शहराध्यक्ष गणेश माने, राष्ट्रीय नाभिक युवक संघटनेचे अध्यक्ष तुकाराम चव्हाण, शहर कार्याध्यक्ष मनोज गावठे, युवकचे कार्याध्यक्ष अनिल शेटे, सोमनाथ खंडागळे, केशव शेटे, महेश माने, दीपक खंडागळे, आदी मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा