maharashtra day, workers day, shivshahi news,

रोपळे येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

रोपळे येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

suicide by hanging, pandharpur, shivshahi news

पंढरपूर तालुक्यातील रोपळे बुद्रुक येथील 35 वर्षीय तरुण संजय गुरव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  शनिवार दिनांक 29 मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली असून, याबाबत मिळालेली माहिती अशी. 
 पंढरपूर तालुक्यातील रोपळे गावातील संजय गुरव हा आपल्या कुटुंबासह राहत होता.  गुरव समाजातील असल्याने गावातील मंदिरातील पूजाअर्चा आणि दिवाबत्तीची व्यवस्था करण्याचे काम हे कुटुंब करत असे.  दर शनिवारी ग्रामदैवत हनुमानाची विधिवत पूजा, आरती होत असे.  या आरतीची तयारी करण्याचे काम या गुरव कुटुंबाकडे होते.  काल शनिवार असल्याने नेहमीप्रमाणे हनुमानाची आरती करण्याची तयारी सुरू होती, मात्र यावेळी संजय मदतीसाठी आला नाही.  काही वेळ वाट पाहिल्यानंतर आरती नेहमीप्रमाणे पार पडली.  तरीही संजयचा कुठेच तपास नव्हता.  तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली, असता हनुमान मंदिराच्या वर असलेल्या खोलीमध्ये संजय मृतावस्थेत आढळून आला, त्याने पंख्याला लटकून नॉयलॉन दोरीने गळफास घेतला असल्याचे निदर्शनास आले आहे.  या घटनेची खबर मृताचा भाऊ राजकुमार मधुकर गुरव याने तालुका पोलीस स्टेशनला दिली असता, एपीआय वलेकर, यांच्यासह रोपळे बिट हवालदार अशोक जाधव, पोलीस कॉन्स्टेबल माळी, आदी पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.  पंचनामा केला, मात्र त्यांना संशयास्पद काहीही दिसले नाही.  त्याप्रमाणे नातेवाईकांनीही घातपाताचा संशय व्यक्त केलेला नाही.  त्यामुळे या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद करून, शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.  पुढील तपास हवालदार अशोक जाधव करत आहेत. 


-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !